अर्बन निधीच्या प्रवासात विश्वासाचे नाते महत्त्वाचे असते- माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर




अर्बन निधीच्या प्रवासात विश्वासाचे नाते महत्त्वाचे असते- माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड।
सध्या आर्थिक बाबतीत अनेक गोरगरिबांना मदतीची गरज आहे कोरोना काळामध्ये आर्थिक अडचणींमुळे अनेक जण अडचणीत आले आहेत अशात अर्बन निधीच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यास बँकिंग क्षेत्रात नक्कीच यश प्राप्त होते असा विश्वास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे

बीड शहरात शांताई अर्बन मल्टीपल निधी चा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आला यावेळी वेदाचार्य ह भ प पुरुषोत्तम महाराज यांच्यासह इन्कम टॅक्स ऑफिसर धीरज रंगदळ ,अरुण डाके दिनकर कदम विलास बडगे गणपत डोईफोडे सखाराम मस्के परमेश्वर सातपुते नगरसेवक रवींद्र कदम विनोद मुळूक गणेश वाघमारे यांची उपस्थिती होती,यावेळी संचालक ज्ञानेश्वर शिंदे संदीप शिंदे शाम डाके,व कुटूंबियांनी मान्यवरांचे स्वागत केले

यावेळी बोलताना माजीमंत्री क्षीरसागर म्हणाले की, अर्बन निधी च्या प्रवासात विश्वासाचे नाते अत्यंत महत्त्वाचे असते बँकिंग क्षेत्रात लोकांची संबंध ठेवून त्यांचा विश्वास संपादन करावा लागतो ग्राहकांना परवडेल अशी सेवा आणि सुविधा मिळाली तर नक्कीच अशा संस्था पुढे उत्कृष्ट कार्य करू शकतात सध्या करुणा काळामुळे अनेक जण अडचणीत आले आहेत आर्थिक बाबतीत प्रत्येकाला आता त्याची गरज आहे आव्हान आणि कसोटी या परीक्षेत उतरून या क्षेत्रात कामे करावी लागतात ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहणे महत्त्वाचे असते सर्वसामान्य माणसाला गरजेपुरती रक्कम तातडीने मिळाली तर त्याचा फायदा ग्राहकाला आणि अर्बन बँकांनाही होतो,छोटे छोटे व्यावसायिक यांना मोठ्या बँकेत जी मदत मिळू शकत नाही ती जर आपण उपलब्ध करून त्यांना व्यवसायात प्रोत्साहन दिले तर त्यांना आपल्या बँकेवर विश्वास बसतो,हे काम कठीण आहे पण आज त्याची गरज आहे असे सांगून त्यांनी सर्व संचालकांना शुभेच्छा दिल्या यावेळी मर्यादेत लोक संख्या उपस्थित होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा