राष्ट्रवादीचे केज तालुक्यात आंदोलन




तहसीलदार मेंडके यांना निवेदन

केज । – पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल व गॅसची दरवाढ तसेच वाढत्या महागाईच्या विरोधात केज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारचा केज येथील तहसीलदार कार्यालयासमोर जाहीर निषेध केला. केंद्र सरकारने तातडीने पेट्रोल,डिझेल, खाद्यतेल व गॅस दरवाढ मागे घेवुन देशातील जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्रीव आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या आवाहनानुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल,गॅस वाढ मागे घेतलीच पाहिजे आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तहसीलदार दुलाजी मेंडके यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोराळे,जेष्ठ नेते नवाब मामु, विलास आप्पा जोगदंड, नारायण आबा शिंदे,रमेश आबा शिंदे,उपाध्यक्ष पंडित शिंदे, युवक तालुकाध्यक्ष मुकुंद कणसे, संजय गांधी निराधार समिती चे तालुकाध्यक्ष बालासाहेब बोराडे, शहराध्यक्ष भाऊसाहेब गुंड,पंचायत समिती सदस्य नारायण शिंदे,पिंटु ठोंबरे,बंडु चौधरी,उमाकांत भुसारी,हिंदी भाषिक सेलचे जिल्हाध्यक्ष शरीफभाई सय्यद, सोशल मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष सुरज खोडसे,केज सोशल मिडिया तालुकाध्यक्ष विश्वनाथ गायकवाड,पद्माकर सावंत,विद्यार्थी तालुकाध्यक्ष शाप चटप तसेच तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा