अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरण ; शिक्षक राऊत यांची निर्दोष मुक्तता




Marathwadapatra

July 6, 2021

बीड । गेवराई तालुक्यातील उमापूर येथील शिक्षक भागवत राऊत यांच्या विरोधात चकलांबा पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी बीड जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन खटला सुरु होता. दरम्यान याप्रकरणी साक्षपुराव्याअंती गुन्हा सिध्द न झाल्याने राऊत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

या प्रकरणाची अधिक माहिती अशी कि, गेवराई तालुक्यातील उमापूर येथे भागवत लक्ष्मण राऊत यांचे खाजगी क्लासेस होते. दरम्यान दि.12 आँगस्ट 2019 रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास याच क्लासेसमध्ये शिकवणीसाठी असलेल्या अल्पवयीन मुलीचा राऊत यांनी विनयभंग केल्याची तक्रार चकलांबा पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानुसार भागवत राऊत यांच्यावर कलम ३५४ (अ) भा.द.वी तसेच कलम ८/१२ बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ अन्वये गुन्हा नोंद केला गेला होता. सदर तक्रारीच्या अनुषंगाने चकलंबा पोलिसांनी तपासाअंती मा.विशेष सञ न्यायालय बीड येथे दोषारोप पञ दाखल केले होते. यानंतर विशेष सञ न्यायालयात खटला क्र.५१/२०१९ प्रलंबित होता. सदरील प्रकरणाच्या निकालाकडे सबंध गेवराई तालुक्याचे लक्ष लागून होते. दरम्यान खटल्यात सरकार पक्षाने ५ साक्षीदार तपासले परंतू एका ही साक्षीदाराची साक्ष आरोपी विरोधात गुन्हा सिद्ध करु शकली नाही. त्यामुळे सोमवारी याप्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात झाली. भागवत राऊत यांच्यातर्फे ॲड. के.टी.उगलमुगले यांनी काम पाहिले असून त्यांनी घेतलेला बचाव व सबळ पुराव्या अभावी भागवत लक्ष्मण राऊत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा