जिल्हाधिकार्‍यांनी पीक कर्ज वाटपाकडे लक्ष द्यावे- अजय दाभाडे यांची मागणी




जिल्हाधिकार्‍यांनी पीककर्ज वाटपाकडे लक्ष द्यावे- अजय दाभाडे यांची मागणी

राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकर्‍यांची अडवणूक 

बीड l जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खरीप हंगामात पीककर्जाचे वेळेवर वाटप करा अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी बँकांना दिल्या आहेत. 1600 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ठही ठरवून दिले आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकर्‍यांची अडवणूक केली जात असून जिल्हाधिकार्‍यांनी केवळ सुचना देवून न थांबता थेट पीककर्ज वाटपात लक्ष घालावे अशी मागणी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमूख अजय दाभाडे यांनी केली आहे.
अजय दाभाडे यांनी सोमवारी (दि.5) तहसिलदार सचिन खाडे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यामध्ये म्हटले आहे की, जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सन 2021-22 मध्ये खरीप हंगामात 1600 कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ठ आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सर्व बँकांना उद्दिष्ठ पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. परंतू राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकर्‍यांना पीककर्ज वाटप करतांना अडवणूक केली जात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या कागदपत्रांच्या व्यतीरिक्त कागदपत्रांची मागणीसह कुठल्याही मुद्यांवरुन शेतकर्‍यांची अडवणूक केली जात आहे. गेवराई तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका तर कोरोनाचे कारण देत शेतकर्‍यांना बँकेतही उभा करत नाहीत. दलालांच्या माध्यमातून शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूकही अनेक ठिकाणी होत आहे. त्यामुळे वेळीत गेवराई तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकार्‍यांना सुचना देवून विनाविलंब शेतकर्‍यांना कर्ज वाटपाचे आदेश द्यावेत, अन्यथा शेतकर्‍यांसह आपणही कायदा हातात घेवून संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी या निवेदनात दिला आहे. निवेदनावर शेतकरी नेते नानासाहेब पवार, बद्रीनाथ लोणकर, निलेश हिंगे, संतोष हिंगे, गणेश ढेंगळे, बाळू बजगुडे, राजू बंगाळ, सचिन वलेकर, प्रशांत बजगुडे, नारायण बजगुडे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा