पेट्रोल ,डिझेल, गॅस, महागाईच्या विरोधामध्ये बीडमध्ये काँग्रेसचे अनोखे आंदोलन




इंधन दरवाढ व महागाई विरोधात बीड जिल्हा काँग्रेस कमेटीची सायकल याञा

काँग्रेसच्या आंदोलनास जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद-जिल्हाध्यक्ष -राजकिशोर मोदी यांची माहिती –

बीड ।
जीवघेण्या महागाई विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार तसेच प्रांताध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांचे आदेशानुसार बीड जिल्ह्यात ९ जुलै ते १५ जुलै २०२१ या कालावधीत आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.शनिवार,दिनांक १० जुलै रोजी “सायकल याञा” काढून इंधन दरवाढ व महागाई यांचा निषेध करण्यात आला.या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सेक्रेटरी व बीड जिल्हा प्रभारी प्रा.सत्संग मुंडे आणि अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक रविंद्र दळवी हे सहभागी झाले.तसेच बीड काँग्रेसचे कमिटीचे सर्व पदाधिकारी व विविध विभागाचे जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष आणि कार्यकर्ते यांनी ही सक्रिय सहभाग नोंदवला अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.

इंधन दरवाढ व महागाई यांचा निषेध करीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संबोधित करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सेक्रेटरी व बीड जिल्हा प्रभारी प्रा.सत्संग मुंडे म्हणाले की,केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल,डिझेल,एलपीजी गॅस,खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे.महागाईने जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे.या जीवघेण्या महागाई विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार तसेच प्रांताध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांचे आदेशानुसार बीड जिल्ह्यात ९ जुलै ते १५ जुलै २०२१ या कालावधीत आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज बीड या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल याञा काढून केंद्रातील भाजप सरकारचा आम्ही निषेध नोंदवत आहोत.तर याप्रसंगी बोलताना बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार तसेच प्रांताध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांचे आदेशानुसार बीड जिल्ह्यात पेट्रोल,डिझेल,एलपीजी गॅस,खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई विरोधात निषेध करण्यासाठी ९ जुलै ते १५ जुलै २०२१ या कालावधीत आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.या सर्व आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सेक्रेटरी व बीड जिल्हा प्रभारी प्रा.सत्संग मुंडे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष डॉ.जितेंद्र देहाडे हे निरीक्षक म्हणून सर्व आंदोलनात सहभागी होणार आहेत.तरी काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व विविध विभागाचे जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष आणि कार्यकर्ते यांनी यापुढेही आंदोलनात असेच सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले.या जीवघेण्या महागाई विरोधात बीड जिल्ह्यात सर्वत्र आंदोलने करण्यात येत आहेत.शुक्रवार,दि.९ जुलै रोजी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मिनाक्षीताई पांडुळे पाटील यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या आदेशानुसार महागाई विरोधात जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.तसेच महागाई विरोधात बीड जिल्ह्यात शहर व जिल्हा मुख्यालय या ठिकाणी शनिवार,दिनांक १० जुलै रोजी “सायकल यात्रा” काढून केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला.पेट्रोल,डिझेल, गॅस,महागाईच्या विरोधा मध्ये बीड मध्ये काँग्रेसचे अनोखे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात बीड जिल्हा काँग्रेसचे प्रभारी प्रा.सत्संग मुंडे, जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी तालुकाध्यक्ष महादेव धांडे यांनी स्वतः सायकल चालवून आंदोलनात सहभाग घेतला.सायकलवरील महागाईचा निषेध करणारी पाटी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.महागाई विरोधात आज बीड शहरांमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून निघून सायकल याञा बस स्टॅन्ड,लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा,सुभाष रोड,भाजी मंडई,बशीरगंज मार्गे काढण्यात आली.सदर सायकल यात्रेचा समारोप पेट्रोल पंपांवर करण्यात आला.यावेळी बीड शहरातील प्रमुख चौकाचौकात केंद्रातील भाजपच्या
मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी शहरातील सर्व परिसर “वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महेंगा तेल” या घोषणांनी बीडचा परीसर दणाणून गेला होता.या घोषणेमुळे बीड शहरातील सर्व जनतेचे लक्ष केंद्रित झाले व जनतेनेही या आंदोलनास पाठिंबा दिला.या आंदोलनामध्ये बीड जिल्हा प्रभारी सत्संग मुंडे,जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक रविंद्र दळवी,ॲड.कृष्णा पंडित,तालुकाध्यक्ष महादेव धांडे,जिल्हा सरचिटणीस ॲड. राहुल साळवे,शहराध्यक्ष डॉ.इद्रीस हाश्मी,सेवादल जि.अध्यक्ष योगेश शिंदे,ओबीसी अध्यक्ष वचिष्ट बडे,पंचायतराज संघटनचे विभागीय अध्यक्ष राणा चव्हाण,अरूण कांबळे,कचरूलाल सारडा,गोविंद साठे जयप्रकाश आघाव,गणेश राऊत,परवेज कुरेशी,चरणसिंग ठाकूर,नितीन वाघमारे,संतोष निकाळजे,गणेश कारंडे,श्यामसुंदर जाधव,कमर इमानदार,सबदर, देशमुख अविनाश दरपे,प्रितेश दायमा, राहुल लोळगे,अशोक बहिरवाल,ऋषभ कोठारी,राहुल टेकाळे,महेश मस्के तुषार मस्के यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते हे स्वतः सायकल चालवत सायकल यात्रेत बहुसंख्येने सहभागी झाले होते.

११ ते १५ जुलै दरम्यान आयोजित महागाई विरोधातील आंदोलनात सहभागी व्हावे

रविवार, दिनांक ११ जुलै रोजी सह्यांची मोहिम राबविण्यात येणार आहे.त्यानुसार ११ जुलै ते १५ जुलै दरम्यान युवक काँग्रेस, एनएययुआय,सेवादल,इंटक,सर्व डिपार्टमेंट व सेल यांनी राज्यातील प्रत्येक ब्लॉक मध्ये जिथे-जिथे पेट्रोलपंप आहेत.तेथे जाऊन इंधन दरवाढी विरोधात सामान्य नागरिकांच्या सह्यांची मोहिम राबवावी.प्रत्येक ब्लॉकमधून किमान ५ हजार नागरिकांच्या सह्या घ्याव्यात.या मोहिमेत जिल्ह्यातील मंत्री,खासदार,आमदार,माजी आमदार खासदार,जिल्हा काँग्रेस कमिटिचे अध्यक्ष व जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी सहभाग घ्यावा.आणि सोमवार,दिनांक मंगळवार,दि.१२ व १३ जुलै रोजी ब्लॉक पातळीवर सायकल यात्रा काढून पेट्रोल, डिझेल,गॅसच्या किंमती विरोधात किमान ५ कि.मी.सायकल यात्रा काढून त्या याञेचा समारोप पेट्रोल पंपाजवळ करण्यात येईल.त्याचप्रमाणे दिनांक १२ ते १५ जुलै या दरम्यान ब्लॉक पातळीवर महिला काँग्रेसचे आंदोलन होईल.महिला काँग्रेसच्या वतीने प्रत्येक ब्लॉक पातळीवर एलपीजी गॅस,खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तुंच्या महागाई विरोधात आंदोलन करण्यात येईल.त्यामुळे दिनांक ११ ते १५ जुलै दरम्यान महागाई विरोधात तीव्र आंदोलन करून केंद्रातील भाजपा सरकारला दरवाढ मागे घेण्यास भाग पाडून सामान्य लोकांना दिलासा मिळावा यासाठी हे जनआंदोलन करण्यात येणार आहे.यावेळेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सेक्रेटरी व बीड जिल्हा प्रभारी प्रा.सत्संग मुंडे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाचे कार्याध्यक्ष डॉ.जितेंद्र देहाडे हे निरीक्षक म्हणून सर्व आंदोलनात सहभागी होणार आहेत.अशी माहिती देवून या आंदोलनात युवक काँग्रेस, एनएययुआय,सेवादल,महिला काँग्रेस,इंटक,सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष,पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा