महागाईच्या विरोधात बीडमध्ये आंदोलन




पेट्रोल ,डिझेल, गॅस, महागाईच्या विरोधामध्ये  काँग्रेसचे  आंदोलन

बीड । जिल्हा काँग्रेस कमिटी व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रीय समन्वयक मा. रवींद्रजी दळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल, डिझेल,गॅस , दरवाढ व महागाई विरोधात सायकल रॅली.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल,डिझेल,एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची भावही गगनाला भिडले आहेत, महागाई प्रचंड प्रमाणावर वाढली आहे.महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे.व असह्य झाले आहे.या जीवघेण्या महागाई विरोधात आज बीड शहरांमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा , बस स्टॅन्ड, अण्णाभाऊ साठे पुतळा, सुभाष रोड, भाजी मंडई, बशीर गंज मार्गे करण्यात आला .यावेळी प्रमुख चौकाचौकात मोदी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शहरातील सर्व परिसर वारे मोदी तेरा खेल ससती दारु मैहेंगा तेल या घोषणांनी दणाणून गेला होता. या घोषणेमुळे बीड शहरातील सर्व जनतेचे लक्ष केंद्रित झाले व जनतेनेही या आंदोलनास पाठिंबा दिला.या आंदोलनामध्ये राष्ट्रीय नेते तथा राष्ट्रीय समन्वयक मा.रवींद्र दळवी साहेब सहभागी झाले तसेच विद्यार्थी कॉग्रेस चे बीड जिल्हाध्यक्ष जयदीप राऊत, राट्रीय समन्वयक अक्षय दळवी,सोशल मीडिया चे प्रदेश समन्वयक सोप्नील दळवी, अविनाश सोळुके,शिवराज शिरसट, अजिंक्य थोटे,माऊली भागवत,निखिल लाखे,सुमीत उबाळे .इतर कॉंग्रेस पदाधिकारी बहुसंख्येने सहभागी झाले होते.
शिवराज शिरसट

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा