सेवानिवृत्त झाल्याने सोळंके यांना नित्रूडकरानी दिला निरोप




 

तेलगाव । माजलगाव तालुक्यातील निञुड येथे शनिवार रोजी ज्ञानेश्वर विद्यालय किटीआडगाव येथील मुख्याध्यापक रामकिसन सोळंके हे दि. 30 जुन रोजी सेवा निवृत्त झाले. त्या अनुषंगाने निञुड येथील ग्रामपंचायत व विजयकुमार डाके , समाजसेवक सुभाष डाके, यांच्या वतीने निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजामाता विद्यालयाचे संस्थापकाध्यक्ष तथा तेलगावचे सरपंच दिपक लगड हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून येथील सरपंच दत्ता डाके, उपसरपंच उत्तम जाधव हे होते.यावेळी गावकऱ्यांच्या वतिने व आयोजकांच्या वतीने सोळंके सरांचा सत्कार करण्यात आला.
या संदर्भात अधिक माहिती अशी की रामकिसन सोळंके हे सेवा निवृत्त झाले या निमित्ताने निञुड येथे त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. सोंळके सर सेवा निवृत्त होतांनि हे किटीआडगाव येथील शाळेचे मुख्याध्यापक असले तरी ते खुप दिवस कै.यशवंतराव चव्हाण विद्यालय निञुड येथे मुख्याध्यापक म्हणून अतिशय चांगल्याप्रकारे काम केले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अनेक विद्यार्थी आज विविध ठिकाणी छोट्या मोठ्या नौकरी स आहेत.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजसेवक सुभाष डाके यांनी केले तर अनेक आजी -माजी विद्यार्थी यांनी सोळंके सरांच्या कार्याचा आठवणींना उजाळा दिला यावेळी सत्कार ला उत्तर देताना निञुड नगरी ही माझी कर्मभूमी असल्याचे सांगितले तसेच माजी आमदार मोहनराव काका सोळंके यांनी ग्रामीण भागातील मुलां -मुलींना शिक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेवून ग्रामीण भागात च आपल्या शाळा चालू करून योग्य कार्य केल्याचे कौतुक ही यावेळी आपल्या भाषणात बोलतांना सोळंके सरांनी आवर्जून उल्लेख केला तसेच मी सेवानिवृत्त होत असलो तरी यापुढेही संस्थेचे कार्य करत राहील अशा शब्द ही यावेळी दिला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजसेवक सुभाष डाके तर सुञसंचालन रामदिप डाके आणि आभार दत्ता घुले यांनी केले.यावेळी तेलगावचे सरपंच दिपक लगड, सरपंच दत्ता डाके, उपसरपंच उत्तम जाधव, विजयकुमार डाके,ग्रा.पं.सदस्य संदिपान तेलगड, पोपट गायकवाड, विकास डाके,शेख शफीक, सुर्यकांत बडे, विशाल डाके, भाऊसाहेब रणदिवे, राजाराम डाके,कै.यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सह आजी-माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा