शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवू – आप्पासाहेब जाधव




शिवसंपर्क अभियान प्रभावीपणे राबवू – आप्पासाहेब जाधव
माजलगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिव विचाराने प्रेरित होऊन शिवसेनाप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार, बीड संपर्क नेते मा.चंद्रकांतजी खैरे, शिवसेना सचिव अनिलजी देसाई, मराठवाडा समन्वयक विश्वनाथजी नेरूरकर, संपर्कप्रमुख मा.आनंदराव जाधव, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिव संपर्क अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवूया असे आवाहन माजलगाव, वडवणी, धारूर, परळी, अंबाजोगाई,केज येथील सर्व शिवसैनिकांना बीड जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केले आहे.
महाराष्ट्रात मराठी माणसाचा स्वाभिमान जागा करत शिवसेनेने मराठी मातीतील माणसाला एकत्र करण्यासाठी शिव संपर्क अभियान दि. १२ ते २४ जुलै दरम्यान सर्व शिवसैनिक मिळून प्रभावीपणे राबवू असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केले आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगली कामगिरी महाराष्ट्र सरकार करत आहे, बेरोजगारांसाठी नवीन नोकर भरती, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासाबरोबरच आरोग्यदायी जीवन मिळावे यासाठी अथक परिश्रम करून शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ न देता ज्ञान पोहोचण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले आरोग्य योजने द्वारे आरोग्याचे प्रश्‍न सोडवणे, तसेच सर्वसामान्य माणसांना चांगले जीवन जगता यावे यासाठी विविध प्रकारे मदत करणे ही कामे सरकार करत आहे. त्या सर्व योजनांची आणि कामांची माहिती सामान्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी हे शिव संपर्क अभियान राबवण्यात येऊन दिनांक 27 जुलै रोजी शिवसेना प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस जिल्ह्यात प्रत्येक गावात शिवसैनिक साजरा करणार असल्याचे आप्पासाहेब जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
याप्रसंगी जिल्हा समन्वयक भाई संजय महाद्वार, उपजिल्हाप्रमुख रामराजे सोळंके, शिवाजी कुलकर्णी, पप्पू ठक्कर, जिल्हा संघटक रामदास ढगे, अशोक गाढवे, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख अतुल दुबे, नगरसेवक अशोक आळणे,तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे, व्यंकटेश शिंदे, संदीप माने, अर्जुन वाघमारे,बाळासाहेब कुरुंद, अनिल बडे, गजानन मुडेगावकर, धनंजय पापा सोळंके, राजेश विभुते विधानसभा समन्वयक राजाभैय्या पांडे, तुकाराम येवले, माऊली गोंडे, स्वप्निल खंडागळे, दासू पाटील बादाडे, प्रभाकर धरपडे नामदेव सोजे, शरद शिंदे,
लक्ष्मण सोळंके, नारायण तौर,संजय शिंदे, नारायण चारबोले, महादेव वैराळे यांसह जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा