धारूर कृषी.ऊ.बा.स.सभापतिपदी सुनील शिनगारे




सभापतिपदाच्या अटीतटीच्या लढतीत सुनील शिनगारे सभापतीपदी विराजमान

किल्ले धारूर ! प्रतिनीधी

धारूर येथील बाजार समिती सभापती पदाची बहुचर्चित निवड प्रक्रिया सोमवार 12 जुलै रोजी संपन्न झाली.या अटीतटीच्या निवडीमध्ये भाजपकडून महादेव तोंडे तसेच उपसभापती असणाऱ्या सुनील शिनगारे यांनी अर्ज दाखल केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंद्रकांत लगड यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता.भाजपकडून दाखल करण्यात आलेल्या दोन अर्जापैकी महादेव तोंडे यांनी माघार घेतल्याने सुनील शिनगारे यांचा सभापती पदाचा मार्ग मोकळा झाला.सभापतीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आंबा साखर चे चेअरमन रमेश आडसकर तसेच राजाभाऊ मुंडे हे बाजार समितीमध्ये तळ ठोकून होते.

महादेव बडे यांच्या निधनाने येथील बाजार समिती सभापती पद रिक्त झाले होते. रिक्त झालेल्या जागेवर 12 जुलै सोमवार रोजी सभापतीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली.भाजपकडून महादेव तोंडे तसेच उपसभापती असणाऱ्या सुनील शिनगारे यांनी अर्ज दाखल केले होते तर राष्ट्रवादीकडून चंद्रकांत लगड यांनी अर्ज दाखल केला होता.अटीतटीच्या झालेल्या या सभापतीपदाच्या निवडप्रक्रियेत मध्ये गुप्त मतदान करण्यात आले.यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 7 तर भाजपला
10 मतदान करण्यात आले.मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीने पार पाडण्यात आली. भाजपकडून दाखल करण्यात आलेल्या दोन अर्जापैकी महादेव तोंडे यांनी आपला अर्ज ऐनवेळी मागे घेतला त्याच वेळी सभापती पदी सुनील शिनगारे यांची निवड होणार हे निश्चित झाले होते. पीठासीन अधिकारी म्हणून केजचे श्री मोठे हे तसेच धारूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाचे शिवराज नेहरकर यांनी कामकाज पाहिले.सभापती सुनील शिनगारे यांच्या निवडीचे आंबा साखर चे चेअरमन रमेश आडसकर तसेच राजाभाऊ मुंडे यांनी स्वागत करत पुढील कार्य काळासाठी शुभेच्छा दिल्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा