बीडमध्ये एकीकडे मुंडे समर्थकांचे राजीनामे, तर दुसरीकडे राणे समर्थकांचा जल्लोष।




बीडमध्ये एकीकडे मुंडे समर्थकांचे राजीनामे, तर दुसरीकडे राणे समर्थकांचा जल्लोष

 

बीडमध्ये एकीकडे मुंडे समर्थक राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे राणे समर्थक नारायण राणे यांना मिळालेल्या कॅबिनेट मंत्रिपदानिमित्त जल्लोष करताना दिसत आहेत.

दै. मराठवाडा पत्र टीम

 

Sun, 11 July 21

 

बीड : खासदार प्रीतम मुंडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळ विस्तारात जागा न दिल्यानं मुंडे समर्थकांमध्ये चांगलीच नाराजी निर्माण झालीय. त्यामुळेच बीडसह राज्यातील अनेक ठिकाणी मुंडे समर्थक भाजप पदाधिकारी आपल्या पक्षीय पदांचा राजीनामा देत आहेत. बीडमध्ये एकीकडे मुंडे समर्थक राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे राणे समर्थक नारायण राणे यांना मिळालेल्या कॅबिनेट मंत्रिपदानिमित्त जल्लोष करताना दिसत आहेत. त्यामुळे हा जल्लोष मुंडे समर्थकांच्या जखमेवरील खपली काढण्याचा तर प्रकार नाही ना अशी चर्चा होतेय. त्यामुळे बीडमधील राजकीय पारा चांगलाच चढलाय

राणे समर्थकांकडून बीडमध्ये गुलाल उधळून फटाके फोडत घोषणाबाजी

बीडमध्ये नारायण राणे यांच्या काही समर्थकांनी रस्त्यावर गाडी उभी करत जोरदार घोषणाबाजी केली. यात ‘राणे साहेबांचा विजय असो’, ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो’, ‘नरेंद्र भाई मोदी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘राणे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘निलेश राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच गुलाल उधळत, एकमेकांना गुलाल लावण्यात आला. इतकंच नाही, तर फटाक्यांची लडही फोडण्यात आली.

प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात डावलले असताना राणे समर्थकांनी केलेल्या या जल्लोषानंतर मुंडे समर्थकांमधील नाराजी आणखीच वाढलीय. त्यामुळे बीडमधील राजकीय वातारवण तणावपूर्ण झालंय.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा