बीड बसपाचे एक दिवसीय घरणे आंदोलन




बीड (प्रतिनिधी) दि.१३विविध मागण्यांकरिता एकदिवसीय धरणे आंदोलन
बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवेदन करण्यात येते की, दि.१३/०७/२०२१ रोजी सकाळी ११.०० वा. ते ४.०० वा. पर्यत करण्यात आले. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रमुख मागण्यांकरिता कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य करण्यात याव्यात मागणी करण्यात आली , मागण्या राज्यामध्ये अनुसुचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाला कायम ठेवण्यात यावे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड याच्यावर चित्तोड प्रकरणी अॅट्रासिटी अॅक्ट गुन्हा दाखल करण्यात यावा, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण ओबीसीचे राजकीय आरक्षण पुर्ववत करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या कृषी मालाला हमी भाव देण्यात यावा,पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करण्यात याव्यात, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करण्यात याव्यात,खाद्यतेलाचे भाव कमी करण्यात यावेत, वाढत्या महागाईला कमी करण्यात यावे,कोरोनामुळे हातघाईस आलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे बीलबील माफ करण्यात यावे,कोविड- १९ मुळे मृत पावलेल्या मृतकाच्या परिवाराला आर्थिक सहकार्य करावे, बसपाचे मराठवाडा झोन प्रभारी प्रशांत वासनिक जिल्हाप्रभारी सतिश कापसे,जिल्हा अध्यक्ष अॅड.अमोल डोंगरे,बीड विधानसभा अध्यक्ष राजनिकात वाघमारे,जिल्हा सचिव चंदनलाल बनगे, माजलगाव विधानसभा अध्यक्ष अरविंद लोंढे,गेवराई विधानसभा प्रभारी कल्याण वाव्हळ,माजलगाव विधानसभा सचिव हरिश साळळे,जालींदर साळवे,बाळासाहेब आठवले, गोरख थोरात, मधुकर धनवे, आदी बसपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Marathwada Patra Team

शेअर करा