राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक; जिल्हाधिकाऱ्यांनी पीककर्ज वाटपाकडे लक्ष द्यावे- सचिन जाधव 




बीड । /मांजरसुमबा शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीककर्जाचे वेळेवर वाटप करा अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी बँकांना दिल्या आहेत. १६०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ठही ठरवून दिले आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असून जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ सुचना देवून न थांबता थेट पीककर्ज वाटपात लक्ष घालावे अशी मागणी सचिन जाधव  यांनी केली आहे
  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०२१-२२ मध्ये खरीप हंगामात १६०० कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ठ आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना उद्दिष्ठ पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. परंतू राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करतांना अडवणूक केली जात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या कागदपत्रांच्या व्यतीरिक्त कागदपत्रांची मागणीसह कुठल्याही मुद्यांवरुन शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. बीड तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका तर कोरोनाचे कारण देत शेतकऱ्यांना बँकेतही उभा करत नाहीत. दलालांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूकही अनेक ठिकाणी होत आहे. त्यामुळे वेळीत बीड तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकान्यांना सुचना देवून विनाविलंब शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे आदेश द्यावेत, अन्यथा शेतकन्यांसह आपणही कायदा हातात घेवून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही आन्यथा राष्ट्रीय महामार्ग 52 वरति रास्तारोको केला जाईल.असा इशाराही सचिन जाधव यांनी या पत्रकात दिला आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा