दोन पोलिसांसह चौघांना अटकपूर्व जामीन मंजूर- ऍड.नेहरकर




 

बीड l  माजलगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीच्या वतीने अॅड. तेजस नेहरकर (जिल्हा न्यायालय बीड) यांनी युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने दि.19/07/21 रोजी सहा आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला, या प्रकरणाकडे जिल्हा पोलिस दलाचे लक्ष लागले होते. आरोपीच्या वतीने अॅड. तेजस नेहरकर हे काम पाहत आहेत. अधिक माहिती अशी की, फिर्यादी ही तिच्या पतीसोबत गेवराई येथे राहत असताना फिर्यादीचे पती तिच्या चारित्र्यावर संशय आल्याने विचारपूस केली असता तिचे पती फिर्यादीला म्हणाला की माझे एका महिलेसोबत प्रेम संबंध आहेत, मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे. मला तू आवडत नाहीस असे म्हणाला असता फिर्यादीने अनैतिक संबंधाला विरोध केला असता यातील आरोपींनी संगणमत करून वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला तसेच चार चाकी वाहन घेण्यासाठी तुझा माहेर कडून चार लाख रूपये घेऊन ये नाही तर तुला जीव मारून टाकू अशी धमकी दिली. दि.26/11/2020 रोजी काही कारण नसताना फिर्यादीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच दिनांक 05 /12/2020 रोजी फिर्यादीच्या सासूने फिर्यादीला जीव मारण्याच्या उद्देशाने अंगावर रॉकेल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केला व इतर आरोपींनी प्रोत्साहन दिले. अशा फिर्यादीवरून दिनांक 16/07/ 2019 रोजी पोलीस स्टेशन धारूर येथे गु.रं.न. 162/2020 अन्वये कलम 307, 498अ, 504, 506, 24 भा. द. वी. गुन्हा नोंद झाला आहे. आरोपीच्या वतीने अँड.तेजस सुभाष नेहरकर (जिल्हा न्यायालय बीड) हे काम पाहत आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा