कै.व्यंकटराव डावळे नंतर स्वाराती रुग्णालयाला मिळाले कार्यक्षम -अधिष्ठाता शिवाजी सुक्रे




 

रुग्ण व नातेवाईक यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारे खरे कोरोना योद्धा ..
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही सुरत बदलनी चाहिये..!

27 जुलै 2020 ते 27 जुलै 2021 वर्षपुर्ती

अंबाजोगाई ।
डॉ.शिवाजी सुक्रे यांनी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा पदभार हाती घेतल्याचे आज वर्षपूर्ती झाली. त्यानिमित्तानं डॉ.शिवाजी सुक्रे यांच्याशी दैनिक आदर्श गावकरी च्या प्रतिनिधींनी साधलेला संवाद. 27जुलै 2020 ला डॉ.शिवाजी सूक्ते यांनी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता पदाचा पदभार घेतला.त्यानंतर वर्षभरात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
प्रमुख्याने सांगायचे झाले तर स्वच्छतेचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अथवा रुग्णांना व नातेवाईकांना येणाऱ्या अडचणी असतील या सोडवण्यासाठी २४तास हेल्पलाइन नंबर चालू केला.महिला रुग्णांसाठी स्वतंत्र ईसीजी रूम तयार करून त्या ठिकाणी महिला कर्मचारी नियुक्त केले. नातेवाईकांना संवाद साधण्यासाठी ‘रुग्ण संवाद समितीची’ स्थापना केली. रुग्णालयामध्ये आल्यानंतर कोणता विभाग कुणीकडे आहे हे लक्षात येत नव्हते. त्यामुळे या ठिकाणी दिशादर्शक फलकांची आवश्यकता असल्याचे त्यांना लक्षात आल्यानंतर प्रत्येक विभाग निहाय दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. याठिकाणी पालकमंत्री यांच्या सहकार्याने स्वाराती रुग्णालयास अद्ययावत डिजिटल एक्सरे (रेडिओग्राफी) मशिन्स साठी सातत्याने पाठपुरावा करून उपलब्ध करून घेतलीआहे. या मशीन खरेदीसाठी पालकमंत्र्यांनी ४२.६० लाख रुपये जिल्हा वार्षिक विकास योजनेतून उपलब्ध करून दिले.स्वाराती रुग्णालयात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी १५ लाख रुपये किमतीची आरटीपीसीआर मशीन व दहा लाख रुपयांचे बायोसेफ्टी कॅबिनेट देखील खरेदी करण्यात आले.स्वाराती ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी याबाबत मागणी केली होती.धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ऑक्सिजन प्लांट स्वाराती येथे शिफ्ट करण्यात आला.विद्युतअडथळा दूर होण्यासाठी एक्सप्रेस फिडर लाईट जोडून घेण्यात आलेला आहे. याच बरोबर जवळपास २९० ते ३०० जम्बो सिलिंडर लिक्विड ऑक्सिजन एका दिवसात निर्माण होत आहेत. यामुळे स्वारातीमध्ये आणखी ऑक्सिजन बेड वाढविता येणार असल्याचे डॉ. शिवाजी सुकरे यांनी सांगितले.

२५६ स्लाईस सिटी स्कॅनचा प्रस्ताव पाठवला असून पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरात उपलब्ध असलेली अद्ययाव २५६ स्लाईस सिटी स्कॅन मशीन स्वाराती ग्रामीण रुग्णालयात नव्हती. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या शहरात जावे लागत होते. ही अडचण लक्षात येताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी २५६ स्लाईस सिटी स्कॅन मशीन खरेदीचा प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा प्रशासनामार्फत याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आला आहे.सुरू झालेले विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळा अविरतपणे सुरू आहे. आणि त्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास ५८ हजार पेक्षा जास्तच्या टेस्ट केल्या आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये याकरिता जम्बो सिलेंडरची उभारणी केली. रुग्णालयामध्ये प्रवेश करतांना सुसज्ज अशी कमान बनवली. रुग्णालय परिसरामध्ये अस्ताव्यस्त पार्किंग ला आळा घालून पार्किंग व्यवस्था निर्माण केली. रुग्णालय परिसरामध्ये असणाऱ्या खुल्या जागेत सुशोभीकरण करून पावर ग्रिड दाखवण्यात आले.
कोरोनाच्या महामारीत नियोजनबध्द पध्दतीने परिस्थिती हाताळल्याने कोरोना सारखा आजार आटोक्यात आणला.त्यासाठी रात्री-अपरात्री परजिल्ह्यात स्वतः जाऊन ऑक्सीजन सिलेंडर आणले.त्यामुळे अनेकांना जीवनदान मिळाले.
त्याचबरोबर पत्रकार ,राजकीय नेते ,सामाजिक कार्यकर्ते यांनी केलेल्या तक्रारी व सूचनांचे निराकरण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात.रुग्णाची निगडित असणारे अनेक प्रश्न मार्गी लावले आहे.यामुळे स्वारातीच्या कारभाराबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
यासारखे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे शहरातील तीन ही कोवीड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये घरगुती अथवा खाजगी रुग्णालयात उपचार करून जास्त अस्वस्थ असणारे रुग्ण स्वारातीच्या डीसीसीएच सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होतात. या सेंटरमध्ये अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्यासाठी सेंट्रल ऑक्सीजन सिस्टीम बसवण्यात आली आहे. या सेंटरमध्ये उपचार घेणा-या ४० रुग्णांना या सेंट्रल ऑक्सीजन सिस्टीम व्दारे ऑक्सीजनवर ठेवून उपचार प्रणाली सुरु होती. काल दुपार पर्यंत या सिस्टीमला ऑक्सीजन पुरवठा करणान्या यंत्रणेने ऑक्सीजनचा पुरवठा न केल्यामुळे चिंतेचे वातावरण

निर्माण झाले होते. ही गंभीर परिस्थिती लक्षात येताच अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी तात्काळ ऑक्सीजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेशी थेट लातुर येथे जावून संपर्क साधत सर्व सेंट्रल ऑक्सिजन प्लॅन्ट चार तासात पूर्ववत केला यामुळे ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत झाला स्वारातीच्या डीसीसीएच सेंटरच्या युनीट मधील अत्यवस्थ असलेल्या ४० रुग्णांचा ऑक्सीजन पुरवठा सुरळीत झाला व त्यांची प्रकृती स्थीर झाली. हा ऑक्सीजन पुरवठा वेळेवर सुरळीत झाला नसता तर काय झाले असते याचा विचार ही न केलेलाच बरा. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी केलेल्या या शर्थीच्या प्रयत्नाबध्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
वर्षभरात सरकारनं केलेल्या कामाचा आढावा पंतप्रधान मोदींनी या पत्रामध्ये घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पत्रात असं म्हटलं आहे की, 2019 मध्ये आपल्या आणि जनतेचे आशीर्वाद वर्षभरात घेतलेल्या मोठ्या निर्णयांसाठी होते. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्राने देश सामाजिक, आर्थिक, जागतिक किंवा अंतर्गत प्रत्येक दिशेने पुढे जात आहे.

या ऐतिहासिक निर्णयांच्या दरम्यानही असे अनेक निर्णय आणि बदल झाले आहेत ज्यांनी भारताच्या विकासाला नवीन वेग आणि नवीन उद्दीष्टे मिळाली आहेत. लोकांच्या अपेक्षाही पूर्ण झाल्या.
या वर्षात आलेलं कोरोनाचं संकट. देशातील विकासाचा वेग वाढत असतानाचा कोरोनानं भारताला विळखा घातला. लॉकडाऊनपासून ते आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना वॉरियर्सला मदत करण्यापर्यंत जनतेनं चांगली साथ दिल्यामुळे आज जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. भारतातील संख्या सर्वाधिक आहे त्यामुळे कोरोनाचा उद्रेक झाल्यास जगात धोका निर्माण होईल ही जगभरात भीती व्यक्त केली जात असताना भारत विकसनशील देश असूनही काय करू शकतो हे आपण दाखवून दिलं.

रुग्णालयातील डॉक्टरांना सॅल्युट !

अंबेजोगाईच्या रुग्णालयात रुग्णांना योग्य तो उपचार दिला जात नाही, कर्तव्यात कसूर करतात, औषध गोळ्या मिळत नाहीत अशा अनेक रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी होत्या. रुग्णालय फक्त रुग्णालयाचा कॅप्टन बदलला. डीन डॉ. शिवाजीराव सुक्रे यांनी कोरोनाच्या महामारीत आपल्या अंगी उत्तम प्रशासक असल्याचे दाखवत, अत्यंत कठीण प्रसंगात मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. द्धेश्वर बिराजदार व त्यांचे सर्व सहकाऱ्यांना लागेल ती मदत यंत्रणा उपलब्ध करून देण्याची तयारी नुसती खवली नाही तर त्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे गेली अनेक वर्षात अंबेजोगाईच्या रुग्णालयातील क्टर मंडळी मध्ये टीम वर्क ही संकल्पना मोडीत निघाली होती. डीन पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर . शिवाजीराव सुक्रे सरांनी ती पुन्हा पुनरुज्जीवित केली. मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. बिराजदार पासून र्डबॉय पर्यंत सर्वजण कोरोना वार्डातील रुग्णांची रुग्णसेवा चांगल्या पद्धतीने करत आहेत. एवढे परिश्रम ऊन अनेक वेळा या विभागातील अनेक डॉक्टर, परिचारिका, ब्रदर अनेक जण कोरोना बाधित झाले.

खंत — वर्ग 1 ते 4 पर्यंत कर्मचाऱ्यांची 30 % रिक्त पदे
विद्युत विभाग कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता नसणे.
अद्ययावत यंत्रसामग्री चालवण्यासाठी योग्य कर्मचारी नसणे.
दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक सारख्या ठिकाणाहून स्वारातीकडे कर्मचारी येण्यास तयार नसणे.शस्त्रक्रिया ग्रह वातानुकूलित नसणे.

त्याचबरोबर कोरोणाच्या तिसऱ्या लाट याची खबरदारी म्हणून अनास्थेशिया, मेडिसिन विभागांतर्गत व्हेंटिलेटर चे एकूण शंभर बेड तयार आहेत.

कोरोना परिस्थितीमुळे सर्वच क्षेत्रात अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन तत्काळ प्रत्येक गोष्टीत निर्णयक्षम भुमीका रुग्णालयात करोनारुग्णांची काळजी घेताना सर्व घटकांना सोबत घेऊन या संकटावर मात करण्याचे आम्ही ठरविले. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पालकमंत्री आमदार सेवाभावी संस्था सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य याच्या बळावर आपण चांगली रुग्णसेवा देण्यासाठी तत्पर आहोत. आपण मनाची सकारात्मक तयारी केली, सर्व काही साध्य करता येतं.
डॉ. शिवाजी सुक्रे अधिष्ठाता स्वा. रा. ती. अंबाजोगाई

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा