उत्पादन शुल्क विभागाची धाब्यावर धाड




केज । केज तालुक्यात  उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाब्यावर धाडी टाकून दोन ढाब्यावरून देशी व विदेशी दारूच्या सुमारे नऊ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
याबाबतची माहिती अशी की, 22 जुलै रोजी दारूबंदी विभागाचे अधिकारी अंकुश राठोड यांच्या पथकाने केज तालुक्यातील साळेगाव व सुर्डी पाटी येथील दोन धाब्यावर अवैध्यरित्या दारू विक्री होत असल्याच्या मिळालेल्या गुप्त खबर्याच्या माहिती वरून धाड टाकली. या धाडीत त्यांना एका धाब्यावर देशी दारूचा 4 हजार 320 रुपये किंमतीचा दीड बॉक्स आणि दुसर्या धाब्यावर 4 हजार 800 रुपये किंमतीची विदेशी बनावटीची दारू ताब्यात घेतली.
दरम्यान या धाडी बाबत अधिक माहिती अशी की, हे पथक एका खाजगी गाडीतून आले असल्याची आणि त्यांनी काही ठिकाणी भेटी देत कार्यवाहीचा नुसता फार्स केला असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. याविषयी विभागातील अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अधिक माहिती दिली नाही.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा