विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देणार तरी कधी ? 




शेकडो शिक्षक शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बसले  धरणे आंदोलनाला।
पुणे । महाराष्ट्रामध्ये शासनाने अनुदानित शाळेमध्ये मंजूर केलेल्या नैसर्गिक वाढीच्या तुकडय़ाना  नऊ वर्ष झाले तरी त्यांच्या तपासण्या मध्येच गुंतवून ठेवले आहे शासनाने दहा दहा वेळेस तपासण्या करूनसुद्धा त्यांना अनुदान भेटत नाही. याकरिता शाळा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत अघोषित शाळा वर्ग तुकडय़ा सन २०१२-१३या  तुकड्याच्या याद्या लवकरात लवकर शासनास सादर कराव्यात यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये शासनाने  मात्र केलेल्या अनुदानित शाळांमधील वर्ग तुकड्या यांना तात्काळ अनुदानाचे घोषित करून यांच्यावरील चालू असलेले वेठबिगारी संपवून शासनाने त्वरीत अनुदान द्यावे  अशा मागणीसाठी पुणे येथे आंदोलन चालू आहे या आंदोलनासाठी संघटनेचे श्रदेश कुलकर्णी,अतुल भांडवलकर,सचिन देसले,हनुमान बडे, अशोक तांबडे,नखाते विलास,मंत्री विष्णु, विष्णु आंधळे  यांच्यासह पुणे येथे शेकडो शिक्षक उपस्थित आहेत…
      — “विनाअनुदानित शिक्षकांना तात्काळ अनुदान द्यावे या शिक्षकांच्या शाळांची तीन तीन वेळेस तपासणी केल्या तरी त्यांना काही अनुदान मिळालेच नाही.”
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा