प्रहार संघटनेच्या तालुका संपर्क प्रमुख पदी- इब्राहिम शेख




प्रहार संघटनेच्या गेवराई तालुका संपर्क प्रमुख पदी इब्राहिम शेख यांची निवड

गेवराई। तालुक्यातील प्रहार संघटनेची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. सध्या प्रहार संघटनेने ला कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी अनेक विविध ठिकाणी प्रहार संघटनेची कार्यकारिणी जाहीर होत असतानाच गेवराई तालुक्यातील ही कार्यकारिणी जाहीर झालेली आहे. महा बच्चू कडू त्यांच्या सूचनेवरून पक्षातील पदाधिकारी पक्ष बळकटीसाठी पक्ष वाढवण्यासाठी कामाला लागलेले आहेत. रोज प्रहार संघटनेच्या कार्यकारणी जाहीर होत आहेत. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे त्या अनुषंगाने प्रहार संघटनेची यमा देवी मंदिर जातेगाव या ठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संघटनेला बळकटी कशा प्रमाणात देण्यात यावी. प्रहार संघटना तालुक्यामध्ये कशी वाढवण्यात येईल. संघटने सोबत कार्यकर्ते कसे जोडता येईल. तळागाळातील माणसांपर्यंत सामान्य माणसापर्यंत प्रहार संघटनेचे ध्येय धोरणे उद्दिष्टे कसे पोहोचवता येतील या साठी कसे प्रयत्न करावे लागतील याही विषयावर चर्चा झाली. त्याचबरोबर प्रहार संघटनेच्या गेवराई तालुका संपर्क प्रमुख पदी तालुक्यामध्ये सर्वांना परिचित असणारे युवा नेतृत्व युवा नेते शेख इब्राहिम यांची प्रहार संघटनेच्या गेवराई तालुका संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. यावेळी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष अर्जुन भाई सुतार , निजाम भाई पठाण, जनार्धन काका पवार, अजय डोंगरे, शेख शकील,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा