बीड जिल्ह्यात उद्या पासून कडक निर्बंध लागु




आष्टी , पाटोदा , शिरुर , गेवराई या चार तालुक्यात कडक निर्बध लागु करण्याचा आदेश

दै. मराठवाडा पत्र वृत्तसेवा

बीड ।  जिल्ह्यात कोरोना वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून जिल्ह्यात परत कडक निर्बध लागु करण्यात येत आहेत . आष्टी , पाटोदा , शिरुर , गेवराई या चार तालुक्यात कडक निर्बध लागु करण्याचा आदेश आज जिल्हाधिकारी यांनी काढला . यापुर्वीच यातील काही तालुक्यात कडक निर्बध लागू करण्यात आलेले आहेत . जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन नियम कडक करु लागले आहे . आज काढण्यात आलेले आदेशात आष्टी , पाटोदा , शिरुर व गेवराई या चार तालुक्यात सकाळी ७ ते दुपारी १२:३० पर्यंत मार्केट सुरु ठेवता येणार आहे . यानंतर फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहेत . यासह शनिवार व रविवार हे दोन दिवस सर्व आस्थापना बंद ठेवण्याचेही आदेश आहेत . जे नियमांचे पालन करणार नाही त्याच्यावर कारवाया करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत . विना मास्क फिरणार्यांवर होणार कारवाई . जिल्ह्यात परत रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे सर्वांनीच नियमांचे पालन करण्याची गरज आहे .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा