लिंबागणेश प्रा.आ.केंद्र व ग्रा.पं. कार्यालय येथे कोविड तपासणी शिबिर




 

मांजरसुबा प्रतिनिधी ।

बीड जिल्ह्य़ातील तिस-या लाटेत ग्रामिण भागातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हाप्रशासनाच्या आणि आरोग्य विभागातील आधिका-यांच्या मार्गदर्शनात लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आधिकारी डाॅ.प्रतिभा रकटे आणि डाॅ.रूपाली राऊत यांच्या सूचनेनुसार आज दिनांक २८ जुलै बुधवार रोजी लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत लिंबागणेश या दोन्ही ठीकाणी कोविड तपासणी अन्टीजेन रॅपीड टेस्ट आणि आरटीपीसीआर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून सरपंच सौ. निकिता स्वप्निल गलधर तसेच भाजपा तालुकाध्यक्ष स्वप्निल गलधर, उपसरपंच शंकर वाणी व ग्रामपंचायत सदस्य यांच्या पुढाकाराने गावात दवंडी देऊन शिबिराची कल्पना देण्यात आली असून आज सकाळी 10:30 ते 3 पर्यंत तपासणी करण्यात येत आहे.

व्यावसायिक दुकानदारांना बंधनकारक अन्यथा दुकान बंद ठेवण्याच्या सुचना – डाॅ.गणेश ढवळे

सरपंच व ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीने ग्रामपंचायत कार्यालय लिंबागणेश मार्फत व्यावसायिक दुकानदारांना कोविड तपासणी करणे बंधनकारक असल्याचे सांगून तपासणी न केल्यास दुकान उघडता येणार नाही अशा लेखी नोटीस दुकानदारांना बजावण्यात आल्या असून आरोग्य कर्मचारी व डाॅ.गणेश ढवळे यांनी दुखानदारांना तपासणी करण्याचे आवाहन केले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा