शिवसेना झाली सेक्युलर ; नगराध्यक्ष झाले जातीयवादी !




शिवसेना झाली सेक्युलर ; नगराध्यक्ष झाले जातीयवादी !

ॲड. शेख शफिक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल – नईम मेंबर

बीड । – शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये स्वर्ग आणि नर्क या दोन्हीचे दर्शन होत असून याला कारणीभूत नगराध्यक्ष असून ते सध्या अघोषितरित्या ज्या शिवसेनेसोबत जुळले आहेत कधीकाळी त्या शिवसेनेला जातीयवादी पक्ष म्हणून बघितले जायचे परंतु आता तीच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत सत्ताधारी होऊन सेक्युलर झाली आहे. तर आपल्या मोठ्या बंधू जयदत्त क्षीरसागर यांच्या अधिकृतरीत्या शिवसेनेसोबत जोडले गेल्यानंतर अनधिकृतरीत्या नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर हे सुद्धा शिवसेनेसोबत जोडले गेले आहेत. मात्र ज्या शिवसेनेने जातीयवादी ते सेक्युलर असा प्रवास केला नेमके याउलट नगराध्यक्ष सेक्युलर ते जातीयवादी असा प्रवास करत असल्याचा प्रत्यय शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये एकीकडे टकाटक भक्ती कन्स्ट्रक्शन व दुसरीकडे अमराई व चाऊस गल्ली ची गलिच्छ व बकाल अवस्था पाहून दिसून येत आहे. भक्ती कंस्ट्रक्शन ही वसाहत हिंदू बहुल असून अमराई व चाऊस गल्ली हा भाग मुस्लिम बहुल आहे. या दोन्ही भागातील अवस्था पाहून दोहोतील तफावत स्पष्ट दिसते. या तफावती मागे नगराध्यक्ष यांचा जातीयवादी दृष्टीकोण असल्याचा आरोप करत एआयएमआयएम चे युवा नेते नईम मेंबर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केला असून जर येत्या बीड नगर परिषद निवडणुकीपूर्वी येथील रस्ते व नाल्या चांगल्या बनविण्यात आल्या नाही तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.
याविषयी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, शहराच्या बालेपीर भागाच्या जवळ असलेल्या अमराई व चाऊस गल्ली येथे नागरी वसाहती निर्माण होऊन चाळीस वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. या काळात गेल्या जवळपास पस्तीस वर्षांपासून नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण क्षीरसागर यांच्या पक्षाचे नगरसेवक या भागात राहिले आहे. फक्त गेल्या निवडणुकीत विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या काकू-नाना आघाडी चा नगरसेवक येथून निवडून आला आहे. तर दुसरीकडे भक्ती कंस्ट्रक्शन ही वसाहत निर्माण होऊन फार तर दहा-पंधरा वर्षे झालेली आहेत. तरीसुद्धा अमराई व चाऊस गल्ली पेक्षा या वसाहती मध्ये चांगले रस्ते, नाल्या, वेळोवेळी पाण्याची सुविधा. आदी नागरी सुविधा येथे मोठ्या प्रमाणात देण्यात आलेल्या आहेत. मात्र या वसाहतीपेक्षा पंचवीस वर्ष आधीपासून अस्तित्वात असलेले अमराई आणि चाऊस गल्ली आज मितीला सुद्धा नागरी सोयी-सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी येथील नागरिक कधी आमदार, कधी नगराध्यक्ष तर कधी प्रशासनिक अधिकाऱ्यांकडे मोठ्या आशेने पाहतात. परंतु त्यांच्या हाती सातत्याने निराशाच लागत असून आजही अमराई व चाऊस गल्ली चांगले रस्ते, नाल्या, वेळोवेळी पाणी पासून वंचित आहे, मागास आहे. परंतू याचे कुठलेही सोयरसुतक या प्रभागातून निवडून येणार्‍या नगरसेवकांसह नगराध्यक्ष व आमदारांनाही नाही. यामुळे या दोन्ही भागात गलिच्छ व बकाल अवस्था वर्षानुवर्षांपासून जशास तशी आहे. अलीकडच्या काळात तर विद्यमान नगराध्यक्षांनी या प्रभागातील भक्ती कन्स्ट्रक्शन या वसाहतीला झुकते माप देऊन तेथील एकूण एक रस्ते व नाल्या टकाटक निर्माण करून दिल्या आहेत. परंतु याच प्रभागातील अमराई व चाऊस गल्ली ला यापासून वंचित ठेवले आहे. यामागे त्यांचा जातीयवादी दृष्टिकोण असल्याचे स्पष्ट दिसत असून ज्या शिवसेनेमध्ये ते मोठ्या भावाच्या अधिकृत प्रवेशानंतर अनधिकृतपणे सामील झाले आहेत ती शिवसेना सुद्धा आज राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सोबतीने सेक्युलर होत राज्याचा कारभार निष्पक्षरित्या हाकत आहे. परंतु नगराध्यक्ष हे जातीयवादी दृष्टिकोन ठेवून बीड नगर परिषदेचा कारभार चालवीत असल्याने हिंदुबहुल भक्ती कन्स्ट्रक्शन स्वर्ग तर मुस्लिम बहुल अमराई व चाऊस गल्ली नर्क झाल्याचा आरोप करत एआयएमआयएम चे युवा नेते नईम मेंबर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केला असून जर येत्या बीड नगर परिषद निवडणुकीपूर्वी येथील रस्ते व नाल्या चांगल्या बनविण्यात आल्या नाही तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफिक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा