१५ ऑगस्ट पुर्वी पीकविमा आणुदान खात्यावर जमा करा नसता तीव्र आंदोलन करू – गणेश बजगुडे पाटील




शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवक्रांती युवा परिषद स्वाभिमानीच्या सोबत रस्त्यावर”


 


बीड l २०२०/ २०२१ चा पीकविमा अनुदान तत्काळ देण्यात यावे, पिकविम्याचा बीड पॅटर्न रद्द करावा, या मागणीसाठी बीड तालुक्यातील घाटसावळी येथे राज्य महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोकोचे आयोजन केले होते. या आंदोलनात शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील व त्यांचे सर्व सहकारी सहभागी होवुन त्यांनी आंदोलनाला पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवक्रांती संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना आसेल किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या संघटने सोबत खांद्याला खांदा लावून लढू व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवू असे म्हणाले. आपण एक शेतकरी पुत्र यानात्याने सहभागी झालेलो असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवक्रांती संघटना कायम लढत आहे व पुढे ही राहील असे शिव क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील म्हणाले, या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीपजी करपे, पिंपळनेर माजी जि. प. सदस्य मनोजजी पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती अरुणजी लांडे, भारतीय काँग्रेस महिला कमिटीच्या तालुकाध्यक्ष सैरांद्रा डोईफोडे, भाजपा ओबीसी मोर्चाचे दत्तप्रसाद सानप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गायकवाड, शिवक्रांती युवा परिषदेचे तालुकाध्यक्ष हनुमान घोडके, समाजसेवक धनंजय गुंदेकर, भेटी लागे जीवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश शिंदे यांच्यासह वडवणी, केज, बीड तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधव आपल्या हक्कासाठी आंदोलनात सहभागी झाले होते.

 

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा