चेक बाउन्स झाल्यास आता खुपमोठा भरावा लागनार दंड




औरंगाबाद : महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी दरमहा सुमारे 10 हजार 500 हजार धनादेश अनादरीत (चेक बाऊंस) होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक वीजबिलासाठी विलंब आकार अधिक जीएसटी करासह 885 रुपयांचा दंड पुढील महिन्याच्या वीजबिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येणार आहे. वीजबिल धनादेशाऐवजी ऑनलाइन पद्धतीने भरण्याचेही आवाहन महावितरणने केले आहे.
वीजबिल ऑनलाइन भरण्याची सोय असली तरी अद्यापही राज्यातील सुमारे 4 लाख 51 हजार वीजग्राहक दरमहा वीजबिलांचा भरणा धनादेशाद्वारे करीत आहेत. मात्र दरमहा सुमारे 10 हजार 500 ग्राहकांच्या वीजबिलांचे धनादेश अनादरित होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व ग्राहकांना प्रत्येक वीजबिलासाठी 750 रुपये बँक ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस व त्यावरील 18 टक्के जीएसटीचे 135 रुपये असे एकूण 885 रुपये आणि विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येणार आहेअनादरित झालेल्या एकाच धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी दंडात्मक रक्कम लावण्यात येत आहे. यासोबतच धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येत आहे. धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात संबंधित रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश अनादरित होत असल्याचे आढळून येत आहे.
धनादेश दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. धनादेश दिल्यानंतर वीजबिल भरल्याची पावती त्याच दिवशी मिळत असली तरी धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच वीजबिल भरणा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे मुदतीच्या एक-दोन दिवस आधी दिलेल्या धनादेशाची रक्कम मुदतीनंतर जमा झाल्याने पुढील वीजबिलामध्ये थकबाकी दिसून येते. लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती किंवा सोसायट्यांच्या वीजग्राहकांचे बिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी या ग्राहकांच्या वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देखील देण्यात येत आहे. वीजग्राहकांनी धनादेशाऐवजी वीजबिलांचा ऑनलाईन भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

ऑनलाइन भरणा केल्यास 0.25 टक्के सूट : महावितरणचे ुुु.ारहरवळीलेा.ळप हे संकेतस्थळ तसेच महावितरण मोबाइल अ‍ॅपद्वारे ऑनलाइन वीजबिल भरणा करणे लघुदाब वीजग्राहकांसाठी घरबसल्या शक्य झाले आहे. एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबत सेवा उपलब्ध आहे. तसेच क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाइल बँकिंगद्वारे भरणा केल्यास वीजबिलामध्ये 0.25 टक्के (500 रुपयांच्या मर्यादेत) सूट आहे. तर क्रेडिट कार्ड वगळता सर्व ऑनलाइन भरणा निशुल्क आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा