अंबाजोगाई शहरातील निर्बंध शिथील करून व्यावसायिकांना दुकाने सुरू ठेवण्यास वेळ वाढवून देवून वीकेंड लॉकडाऊन रद्द करा




 

राजकिशोर मोदी यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अंबाजोगाई (वार्ताहर)
अंबाजोगाई शहरातील कोविड पार्श्वभूमीवर लागू असलेले निर्बंध शिथील करून छोट्या व मध्यम व्यावसायिकांना दुकाने सुरू ठेवण्यास वेळ वाढवून द्यावा तसेच शनिवार आणि रविवारचा वीकेंड लॉकडाऊन रद्द करावा अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सोमवार,दिनांक ९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

 

जिल्हाधिकारी,बीड यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदींकडून दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,मागील दीड वर्षापासून आपण कोरोना या महामारीशी लढा देत आहोत.यासाठी बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत.त्याबद्दल सर्व प्रशासनाचे हार्दिक अभिनंदन व स्वागत करीत आहोत.परंतु,प्रशासनाने आम्ही केलेल्या पुढील सुचनांचा संवेदनशीलपणे विचार करावा.सदर सुचना अशा आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली आपणांस या निवेदनाद्वारे अशी विनंती करीत आहोत.की,जनतेच्या व व्यापारी बांधवांच्या ज्वलंत प्रश्‍नाकडे आपले लक्ष वेधित अहोत.बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहर व परिसरात कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे सद्यस्थितीत अंबाजोगाई तालुक्यात संक्रमित रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ ही नियंत्रणात आली आहे.त्यामुळे प्रादुर्भाव प्रतिबंधक उपाययोजने मध्ये सध्या छोट्या व मध्यम व्यावसायिकांची दुकाने केवळ सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.या निर्णयामुळे छोट्या व मध्यम व्यापार्‍यांचे मोठे नुकसान होत आहे.तसेच शनिवार व रविवार या दोन दिवसात वीकेंड लॉकडाऊन केले जात असल्याने प्रत्येक सोमवारी बाजारपेठेवर ताण येवून मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.त्यामुळे वीकेंड लॉकडाऊन तात्काळ रद्द करण्यात यावा.दुकाने सुरू ठेवण्यास वेळ कमी असल्याने व्यापार्‍यांत प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची भावना दिसून येत आहे.अर्थकारण कोलमडले आहे.यामुळे लोकभावनेचा कधीही उद्रेक होवू शकतो.हे आपण लक्षात घेवून नियमावलीमध्ये बदल करुन व निर्बंध शिथील करुन छोट्या व मध्यम व्यावसायिकांना दुकाने सुरू ठेवण्यास जादा वेळ वाढवून द्यावा,सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेपर्यंत अंबाजोगाई शहर व परिसरातील सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी यामुळे अंबाजोगाईतील बाजारपेठेचे व एकूण अर्थकारणाचे कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर लागू असलेल्या निबर्ंधामुळे होणारे प्रचंड नुकसान काही प्रमाणात टळेल व व्यापारी आणि लघुउद्योजकांना दिलासा मिळेल.व्यापारी बांधव मास्क,सॅनिटायझरचा वापर करून व फिजिकल डिस्टन्स पाळून सर्व नियमांचे पालन करतील.तरी सद्य परिस्थिती पाहून नियम तात्काळ शिथिल करावेत अशी विनंती करण्यात आली आहे.सदरील निवेदनावर बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, उपाध्यक्ष गोविंद पोतंगले,शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक मनोज लखेरा,नगरसेवक वाजेद खतीब, नगरसेवक धम्मपाल सरवदे,राणा चव्हाण, दिनेश घोडके,शेख मुख्तार,अकबर पठाण,सचिन जाधव, महेबूब गवळी,शाकेर काझी,रफीक गवळी, जुनेद सिद्दीकी,प्रताप देवकर,अमोल मिसाळ,महेश वेदपाठक यांच्यासह इतरांच्या स्वाक्ष-या आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा