जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात होणार छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन




 

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे मराठा क्रांती मोर्चाला आश्वासन!

बीड । बीड जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीसमोर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा यासाठी आज बीड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते या लाक्षणिक उपोषण उपोषणासाठी अनेक समाज बांधव उपस्थित होते शंभू प्रेमी उपस्थित होते शंभूप्रेमी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या लाक्षणिक उपोषणला आमदार संदीप क्षीरसागर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे बांधकाम सभापती जयसिंग सोळंके जिल्हा परिषद सदस्य भारत काळे अशोक लोढा प्रकाश कवठेकर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे आणि मराठा क्रांती मोर्चा चे सदस्य उपस्थित होते. या लाक्षणिक आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित सर्व समाज बांधवांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी सांगितले की छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बीड जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीसमोर उभा राहील यावेळी जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आहे त्याच्या कार्यक्रम पत्रिकेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन याचे उद्घाटन होईल असे सांगून मराठा क्रांती मोर्चाला आश्वस्त केले यावेळी बांधकाम सभापती जयसिंग सोळंके यांनी सांगितले की छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळा बसविण्यासाठी ची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून उर्वरित परवानग्या लवकरच घेतल्या जातील तसेच पुतळ्यासाठी आर्थिक तरतूद देखील करण्यात आली असून लवकरच या पुतळा निर्मितीसाठी शिल्पकार काम सुरू करणार असून बीड जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल असे सांगून लाक्षणिक उपोषणा साठी बसलेल्या सर्व मोर्चे करांचे आंदोलकांचे त्यांनी समाधान केले मराठा क्रांती मोर्चाची हे महत्वपूर्ण मागणी मान्य केल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बीड जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा