प्राथमिक आरोग्य केंद्राचं नविन बांधकाम करण्यासाठी आमरण उपोषण करणार  – परमेश्वर घोडके




प्राथमिक आरोग्य केंद्राचं नविन बांधकाम करण्यासाठी आमरण उपोषण करणार  – परमेश्वर घोडके

दौलावडगाव  आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत गेल्या कितेक वर्षा पासुन नादुरुस्त आहे. वेळो वेळी संबधीत विभागास निवेदनं देऊन नविन बाधकामं चालू होतं नाही म्हणून स्वातंत्र्य दिनी दिनांक १५/०८/२०२१ रोजी सकाळी ठिक १०;०० वा नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते श्री परमेश्वर रामचंद्र घोडके हे सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्र समोर आमरण उपोषण करनांर आहेत. सविस्तर माहीती अशी की ,सदर प्राथ.आ.केंद्रातंर्गत ४४ गावाच्या आरोग्य सेवेसाठी समावेश आसून जुनी ईमारत नादुरुस्त आसून ईमारतीच्या कितेक भाग खचल्या खचलेली अवस्था झाली आहे.कुठल्याही शणि छत खाली कोसळला जाऊ शकतो. इमारतीत एकही काॕटर्स व्यवस्थित नसून काही भाग पडला तर काही पडण्याच्या प्रतिक्षेतआहे.वेळी वेळी संबधीत विभागास ही माहिती दिली आसतां सन २०१६ मध्ये बाधकामं उपविभाग आष्टी यांनी पाहणी करून सदर बाधकामं हे नादुरुस्त असून वापरासाठी धोकादायक आहे असा अहवाल दिलेला आहे.तरी आज पर्यत पाच वर्षात कोणत्याच विभागामार्फत नविन बाधकामं चालू केल्या गेले नाही. वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा वरिष्ठ अधिकारी हे तोंडी उत्तर देऊन टाळाटाळ करत आहे.
४४ गावातील रूग्णासह कर्मचाराच्या जिवितास धोकादायक आहे. उपोषण हे कोणत्याही राजकिय पक्षाशी निगडीत नसून
उपोषणाचे निवेदनं मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड,जिल्हाधिकारी साहेब बीड,पोलिस अधिक्षक बीड,तहसीलदार आष्टी,तालुका आरोग्य आधिकारी आष्टी , गटविकास आधिकारी आष्टी ,पोलिस टेंशन अंभोरा, सह आष्टी तालुक्यातील सर्व लोकंप्रतीनिधी यांना देण्यात आलें आहे. ४४ गावातील रूग्णसेवासाठी व भविष्यातील आरोग्य सेवा मिळण्यासाठी गोरं गरिब नागरिकांच्या हक्कासाठी गावातील नागरिकांसह कोरोनाचे सर्व नियम पाळून आमरण उपोषण करनाचें निवेदन सामाजिक कार्यकर्ते श्री परमेश्वर घोडके यांनी दिले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा