आ.भीमसेन धोंडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा- पै.माऊली पानसंबळ यांचा पुढाकार




“साहेब” महोत्सवात कोरोना वाॅरीअर्सचा सन्मान!

आष्टी (प्रतिनिधी): – भाजपाचे मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या वाढदिवसा निमित्त शिरुर कासार येथे भाजपाचे युवा नेते पै.माऊली पानसंबळ यांच्या पुढाकाराने आयोजित पाचदिवसीय ‘साहेब’ महोत्सवामध्ये वृक्षलागवड, शालेय साहित्य, क्रिडा साहित्य वाटपासह तालुक्यातील कोरोना वाॅरिअर्स, सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला. आष्टी, पाटोदा, शिरुर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना संकटामुळे अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक उपक्रम राबवण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिरुर कासार येथील महारथी कर्ण क्रिडा मंडळ व व्यायाम शाळेचे संस्थापक तथा भाजपचे युवा नेते पै.माऊली पानसंबळ यांच्या पुढाकाराने पाचदिवसीय ‘साहेब’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

नगरपंचात कार्यालयाच्या सभागृहामध्ये पद्मश्री शब्बीर सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी किशोर सानप, भाजपचे जि.प.सदस्य रामदास बडे, भटक्या विमुक्त महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अँड.भाग्यश्री ढाकणे-चेमटे, आरोग्य अधिकारी किशोर खाडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदिप आघाव, डॉ.राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला सुरवात करण्यात आला. दरम्यान शेतकर्यांना वृक्षरोपे भेट देऊन सन्मानाने दि.५ रोजी कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. अर्जुनवीर तथा पोलिस उपाधिक्षक राहूल आवारे, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांचा ऑनलाइन सन्मान करण्यात आला. शहरातील अहिल्याबाई होळकर विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपन, शहरातील आरिस मशिद परिसरात वृक्षारोपन, अनाथ निरश्रीत बालकांना फलोआहार, गरिब, गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप त्याच बरोबर क्रिडा क्षेत्रातील गरजु विद्यार्थ्यांना क्रिडा साहित्य व किटचे वाटप करण्यात आले . कोरोना कालावधित जीवाची परवा न करता जबाबदारीने सेवा बजावणाऱ्या डाॅक्टर्स, नर्स, वाॅर्ड बाॅय, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक प्रशासनातील जबाबदार अधिकारी, कर्मचारी, शिक्षकांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. इतरांच्या सदृढ आरोग्यासाठी रस्त्यावर राबणाऱ्या महिला सफाई कामगारांची साडी-चोळी व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी आजिनाथ गवळी, मा.आ.भीमसेन धोंडे यांचे स्वीय सहाय्यक भागवत वारे, सरपंच देविदास गर्कळ, पत्रकार विजयकुमार गाडेकर, गोकुळ पवार, युवराज सोनवणे, सतीश मुरकुटे, मनोज परदेशी, बाळकृष्ण मंगरूळकर, विष्णूपंत सवासे, प्रकाश साळवे यांच्यासह समिर बागवान, उमेश खेडकर, शाम महानोर, विष्णू गोल्हार, सचिन सातपुते, सचिन उपळकर, यशराज झिंजूर्डे आदि उपस्थित होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा