थकलेल्या मानधनासाठी आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक उतरल्या रस्त्यावर




थकलेल्या मानधनासाठी
आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक उतरल्या रस्त्यावर
जिल्हा परिषदेसमोर मानधनासाठी आक्रोश व्यक्त करत केले तिव्र धरणे आंदोल।

बीड | प्रतिनिधी
बीड जिल्हयात कार्यरत असलेल्या आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांचे मानधन एप्रील २०२१ पासून थकीत आहे. चार महिन्याचे मानधन थकल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. मानधन मागूनही मिळत नसल्याने आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांनी
जिल्हा परिषदेसमोर तीव्र आक्रोश व्यक्त करत केले आज दि. 12 ऑगस्ट रोजी धरणे आंदोल केले. आणि आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नेमलेले जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पवळ साहेब, जिल्हा समनवयक बादाडे यांना देण्यात आले. हे आंदोलन महासंघाच्या नेत्रत्वाखाली करण्यात आले.

आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आंबाजोगाई तालुक्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रतर्वकांचे मानधन नियमित होते तर इतर तालुक्याचे मानधन चार महिने थकले जाते हा आन्या का? या दुजाभावामुळे आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांच्या भावना तिव्र संतप्त झाल्या होत्या तेव्हा प्रशासनाने 12 ऑगस्ट पूर्वी सर्व मागण्या मान्य कराव्यात या साठी निवेदन दिले होते. मात्र मागण्या मान्य न झाल्याने आज संतप्त आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक रस्त्यावर उतरल्या आणि १२ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक महासंघाच्या नेत्रत्वाखाली रस्त्यावर उतरल्या. आणि आपला रोष व्यक्त केला.

या आहेत मागण्या
‘थोडेसे माय-बापासाठी पण’ या उपक्रमाच्या अनुषंगाने वृदध नागरीकांचे सर्वेक्षण करण्याचे काम आशा स्वंयसेविकांना विभागीय आयुक्त यांच्या आदेशान्वये देण्यात येत आहे. आशा स्वयंसेविकांच्या सेवाशर्तीनुसार त्यांची सेवा कामावर आधारीत मोबदल्यावर आहे. सदर कामासाठी आशा स्वंयसेविकांना योग्य मोबदला जाहीर केलेला नाही. शासनाच्या आदेशानुसार आशा स्वंयसेविकांना ठरवून दिलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कामे त्यांना सांगावयाची असतील तर त्यांना कामे सांगणार्‍या अधिकार्‍याने योग्य मोबदला देणे आवश्यक आहे. त्यानुसार वृदध नागरिकांचे सर्व्हेक्षण आशा स्वंयसेविकांकडून करुन घ्यायचे असेल तर प्रति आशा प्रति दिन ३००/- रुपये मोबदला त्यांना सदर कामासाठी जाहीर करावा. तसेच चार पानांचा सर्व्हेक्षण फॉर्म त्यांना भरुन सादर करावायाचा आहे. तेव्हा सदर फॉर्म मुबलक प्रमाणात त्यांना उपलब्ध करुन देण्यात यावेत. ३००/- रु प्रतिदिन मोबदला जाहिर केल्याशिवाय आशा स्वयंसेविका काम करणार नाहीत. गटप्रवर्तकांना आशा स्वंयसेविकांनी केलेले सदर कामाच्या रिपोर्टीगचे संकलन करावयाचे काम लावल्यास त्यांना सुदधा प्रतिदिन ५००/- रु. मोबदला जाहीर करावा. अन्यथा सदर कामाची रिपोर्टिंग गटप्रवर्तक करणार नाहीत.
राज्य शासनाने वाढवलेले मानधन एप्रील २०२१ पासून प्रलंबित आहे. तसेच जुलै २०२१ पासून राज्य शासनाने आशा स्वयंसेविकांच्या मानधनात दरमहा रु. १५०० व गटप्रवर्तकांच्या मानधनात दरमहा रु. १७००/- वाढ केलेली आहे. त्याचा तात्काळ जि.आर. काढून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, संपाच्या वाटाघाटी दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी आशा स्वंयसेविका गटप्रवर्तकांचे संपकाळातील मानधन कपात न करण्याबाबत चर्चा झालेली असुन गटप्रवर्तकांचे मानधन कपात केले जाणार नाही असे त्यांनी आश्वासन दिले असल्यामुळे संपकाळातील गटप्रवर्तकांचे मानधन कपात करु नये., कोवीड कॅम्पमध्ये आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना लसिकरणाच्या डयुटया लावल्या जातात. त्याचा मोबदला शासनाने ठरवून दिलेला आहे. त्याप्रमाणे आशा स्वयंसेविकांना व गटप्रवर्तकांना सदर कामाचा मोबदला देण्यात यावा. यासह विविध मागण्या मान्य होण्यासाठी जिल्हापरिषदेसमोर दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. (भगवान देशमुख ) प्रदेशाध्यक्ष , (कमल बांगर) प्रदेश कार्याध्यक्ष, (दत्ता देशमुख) राज्य संघटक, (सचिन आंधळे) बीड जिल्हाध्यक्ष, यांच्या नेत्रत्वाखाली कोरोनाचे नियम पाळून करण्यात आले. यावेळी बीड सह सर्व तालुक्यातील
आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा