श्रावणी सोमवारी जिल्ह्यातील शिवालये कोरोना नियमानुसार दर्शनासाठी खुली करा- शंकर देशमुख




श्रावणी सोमवारी जिल्ह्यातील शिवालये कोरोना नियमानुसार दर्शनासाठी खुली करा- शंकर देशमुख

आष्टी (प्रतिनिधी):
श्रावणी सोमवारचा विचार करून जिल्ह्यातील महादेवाची मंदिरे शिवालय व इतर मंदिरे कोरोना नियमाचे पालन करून खुली करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव शंकर देशमुख यांनी तहसीलदार आष्टी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी बीड यांना केली आहे.
आष्टीच्या तहसीलदार श्रीमती शारदा दळवी यांना दिलेल्या निवेदनात शंकर देशमुख यांनी म्हटले आहे की, अखंड हिंदू समाजाचा पवित्र महिना हा श्रावण महिना आहे. या श्रावण महिन्यात विविध व्रतवैकल्य व आराधना दैवतांची केली जाते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग या महिन्यातून हिंदू समाजाला मिळतो. श्रावणी सोमवार हा या महिन्यातील विशेष महत्त्व असलेला दिवस आहे. या दिवशी शंकराची आराधना मोठ्या प्रमाणात केली जाते. या श्रावणी सोमवारी अनेक ठिकाणी शंकराच्या यात्रा असतात. या सर्व महत्त्वाच्या दिवशीच शासनाने शिवालय व जिल्ह्यातील इतर मंदिरे ही कोरोना कारणामुळे बंद ठेवली आहेत, जेव्हा की शासनाने हॉटेल, सर्व प्रकारची दुकाने, मंगल कार्यालय, मॉल त्याचप्रमाणे एसटी सेवा, रेल्वे सुद्धा लोकल सुरू झाली लग्न समारंभामध्ये दोनशे लोकांची परवानगी शासनाने दिली आहे. एवढे सगळे सुरू होत असताना फक्त मंदिरे का बंद म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांनी श्रावणी सोमवारचा पवित्र दिवसाचा विचार करून जिल्ह्यातील शिवालय शिवमंदिरे व इतर देवतांची मंदिरे उर्वरित चार श्रावणी सोमवार या दिवशी मंदिरे खुली करण्यात यावीत. यामध्ये कोरोना नियमांचं पालन करण्याच्या अटी असाव्यात व पालन करण्याची सक्ती असावी या कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीवर श्रावणी सोमवार या दिवसासाठी मंदिरे खुले करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे, आष्टी शहराध्यक्ष बाबू कदम, उपसरपंच सुरेश दिंडे, अँड.रत्नदीप निकाळजे, आष्टा जि.प.गटप्रमुख दादासाहेब जगताप, सदाशिव दिंडे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा