मराठा आरक्षण मिळे पर्यंत मी पुष्प हार स्वीकारणार नाही तर ओबीसीला न्याय मिळे पर्यंत फेटा बांधनार नाही- पंकजा मुडें




 

काळ संघर्षाचा आहे आपली निष्ठा बाटु देऊ नका- पंकजामुंडे
बीड । भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलेले मराठा आरक्षण आघाडी सरकारला टीकवता आले नाही. तर ओबीसीचे पारंपारीक राजकीय आरक्षण देखील या सरकारणे घालवले आगामी काळात या दोनी समाजाला न्याय मिळवण्यासाठी बीड जिल्ह्यातुन संघर्ष उभा करणार असुन मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी पुष्पहार स्वीकारणार नाही तर ओ.बी.सी चे आरक्षण पुन्हा कायम झाल्या शिवाय फेटा बांधनार नाही अशी प्रतिज्ञा भातीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली. आज बीड येथे बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीने आयोजीत केलेल्या एक दिवसीय कार्यकारणी बेठक व डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियान कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.
बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीने आयोजीत केलेल्या या बैठकीस बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे या उद्घाटक म्हणुन उपस्थित होत्या तर मराठवाडा संघटन मंत्री भाऊराव देशमुख, आ.सुरेश धस, आ.लक्ष्मण पवार आ.नमिताताई मुंदडा, माजी आ.सर्वश्री आर.टी.देशमुख, आदिथराव नवले, केशवराव आंधळे, रमेशराव आडसकर, मोहणराव जगताप, ॲड.सर्जेराव तांदळे, सविताताई गोल्हार. हे उपस्थित होते पुढे बोलताना पंकजाताई म्हणाल्याकी मी सत्ता असताना विकासावर लक्ष केंद्रीत केले, करोडो रुपयांचा निधि आनला. आज सत्ता नसताना पक्षसंघटना विस्तारावर आपण लक्ष दिले पाहिजे. आगामी निवडनुकात पक्ष मजबुत करून यश प्राप्तकरा. उत्तम काम करा पक्षाची ताकद वाढवा. भारतीय जनता पार्टीसाठी हा काळ पक्ष बांधनीच्या दृष्टीकोणातुन महत्वाचा आहे. कार्यकरत्यांनी आपली निष्ठा बाटु देऊ नये या भाषेत कार्यकरत्यांची कान उघडनी केली.
सत्तेच्या काळामध्ये जे लोक माझ्या मागे पुढे फिरुन करोडो रुपयेची कामे मिळवली तेच लोक माझ्या बद्दल व पक्षा बद्दल नाराजीचा सुर काढतात. काही लोकांनी आपली निष्ठा खुंटीला बांधली नेता भेटेल तसे फोटो बदलतात. या पुढे अशा लोकांना मी लक्षात ठेवनार आहे. पक्ष हे माझे घर आहे. या घराकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहु नये काही लोक दिल्ली तुन तिकीट मिळवण्याचे स्वप्न पाहतात. परंतु निवडुन येन्याचे स्वप्न कसे पुर्ण करणार असा सवाल पंकजाताई यांनी उपस्थित केला.
या प्रसंगी उद्घाटन करताना खा.प्रितमताई मुंडे यांनी जिल्ह्यातील बुथ रचना मजबुत करण्याचे आवाहन करुन येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, नगर परिषद व नगर पंचायतीच्या निडनुकीत विजयी होण्यासाठी संघटणातंमक बांधनी मजबुत करावी असे विचार मंडले.
कार्यक्रमाचे प्रस्तावीक भाजपाचे जिल्हाध्क्ष राजेंद्र मस्के यांनी केले तर संघटण मंत्री भाऊरावजी देशमुख यांनी जिल्ह्याच्या बुथ रचनेच्या आडावा घेतला. बैठकीच्या दुसऱ्या भागात कार्यकारणीची सभा संपन्न झाली यात मराठा आरक्षणाला समर्थण देणारा ठराव रमेशराव आडसकर यांनी मांडला व ओ.बी.सी. आरक्षणाला समर्थन देणारा ठराव आ.नमिताई मुंदडा यांनी मांडला. या शिवाय बीड जिल्ह्याचा भाजपा सरकार काळातील झालेला विकास आणि आज खुंटलेला विकास या वर आ.सुरेश धस यांनी ठराव मांडला तर त्याला आ.लक्ष्मण पवार यांनी अनुमोदन दिले. प्रमोद रामदासी यांच्या सुर्फती गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली व कार्यक्रमाचे सुत्र संचालन संघटन सरचटनीस प्रा. देवीदास नागरगोजे आणि भाजपा सचिव शंकर देशमुख यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा