अशोक हिंगे यांच्या झंजावाती दौऱ्याला सुरुवात




उस्मानाबाद लातूर ,नांदेड जिल्हा स्तरीय आढावा बैठकांना पदाधिकाऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद

  1. नांदेड (प्रतिनिधी) दि.१७ वंचित उपेक्षित बहुजनांच्या हातात सत्ता देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची विभागीय कार्यकारणी मराठवाड्याच्या दौऱ्यावर या दौऱ्याची सुरुवात उस्मानाबाद जिल्ह्या पासून सुरू झाली विभागीय कार्यकारणीच्या मराठवाडा दौऱ्याला सर्व ठिकाणे प्रचंड प्रतिसाद मिळत आहे वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र प्रदेश राज्य कार्यकारिणी त्यांचा विदर्भातील दौरा पूर्ण करून आता ही कमिटी मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी वंचित बहुजन आघाडी ची विभागीय कार्यकारणी मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात जाऊन दौऱ्याची पूर्वतयारी जिल्हा तालुका व शहर पदाधिकाऱ्यांकडून करून घेत आहे.
  2. या दौऱ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे (पाटील) मराठवाडा विभागाचे दोन्ही महासचिव रमेश गायकवाड, संतोष सुर्यवंशी विभागीय प्रशिक्षण प्रमुख डॉ. सुरेश शेळके विभागीय उपाध्यक्ष दीपक डोके विभागीय सदस्य डॉ.संघरत्न कुरे आदीसह या दौऱ्यामध्ये उपस्थित होते. दि.१८ परभणी, हिंगोली, जालना,बीड व या दौऱ्याचा समारोप हा औरंगाबाद या ठिकाणी होणार आहे.
संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा