राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या समाधी अभंग रचनेचे भगवानबाबा प्रतिष्ठान येथे अनावरण




राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांच्या समाधी अभंग रचनेचे भगवानबाबा प्रतिष्ठान येथे अनावरण।

बीड । जिल्ह्यातील कवी श्री.द.ल.वारे यांच्या लेखणीतून अवतरलेले राष्ट्रसंत वैकुंठवासी श्री.भगवान बाबा यांच्या समाधी रचनेचे अनावरण भगवानबाबा प्रतिष्ठान ,बार्शी रोड, बीड. या ठिकाणी नगर परिषदेचे माजी सभापती ऍड. महेशजी गर्जे  यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी वंजारी सेवा संघाचे सर्व पदाधिकारी बभाऊसाहेब हंगे, सचिन हंगे, मोहन आघाव, अनिल जाधवर ,अशोक भांगे, विनोद गर्जे,  राठोड, बांगर सर, भाऊसाहेब मिसाळ, बाळासाहेब नागरगोजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अभंगा मध्ये वैकुंठवासी श्री.भगवान बाबा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.

अनावरण झाल्यानंतर रचनाकार श्री.द.ल.वारे यांनी प्रत्येक अभंगाचा अर्थ समजावून सांगितला. उपस्थितांनी समाधी अभंग रचनेचे भरभरून कौतुक केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा