ढेकमोह येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न




 

ढेकमोह येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

नागरिकांचा शिबिरास मोठा प्रतिसाद

ढेकमोहा (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील ढेकणमोहा येथे दिनांक 18/8/2021/ रोजी ग्रामीण विकास मंडळ बनसारोळा लिंकवर्कर स्कीम. व. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय बीड, आय. सी टी सी. जिल्हा रुग्णालय बीड व यांच्या संयुक्त विद्यमाने आज ढेकनमोह येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. या मध्ये सर्वप्रथम HIV/AIDS तसेच गुप्तरोग या बाबतीत उपस्थित गावकऱ्यांना माहिती देण्यात आली. तसेच आजाराबद्दल समज गैरसमज स्पष्ट करण्यात आले. एकूण 112 लोकांची HIV तपासणी करण्यात आली व शुगर रक्त तपासणी 96 जणांची झाली आहे. सोबतच लोकांची शुगर तपासणी करण्यात आली. या वेळी ऊसतोड कामगार ट्रक ड्रायव्हर विट कामगार एफ एस डब्ल्यू शेतमजूर शेतकरी जवळपास 04 रुग्णांना पुढील उपचारांसाठी बीड जिल्हा रुग्णालय येथील पटवण्यात आले. डापको चे. डी एस. सुहास कुलकर्णी, डॉ. सौ. विनिता माटे, सी एच ओ.ए न म.तपसे मॅडम, के.एम. गायकवाड.( डिएसआरसी) इनामदार सर आय सी टी सी. बीड. ग्रामीण विकास मंडळ, रामेश्वर वाघमारे डी आर पी, लिंगवर्रकर अंगद खवतड, अनिता शेजूळ, सामाजीक कार्यकृर्ते व उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. या वेळी कार्यक्रमास ढेकनमोह येथील सरपंच प्रकाश ठाकुर, माजी सरपंच नागेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य रामा भोगे, बळीराम थापडे ग्रामपंचायत सदस्य, नारायण देवकते चेअरमन, भास्कर देवकते, रविंद्र गाडीवान, सर्जेराव जाधव, अनंत करांडे, बळीराम थापडे, भारत देवकते, अनिल कानाडे, पत्रकार विनोद शिंदे, आशा वर्कर, लिंक वर्कर सर्वांचे सहकार्य लाभले. सर्वाचे आभार अंगद खवतड यांनी मानले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा