सीईओ कुंभार यांची बदली बीडला पुणे येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार येणार




सीईओ कुंभार यांची बदली
बीडला पुणे येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार येणार

बीड l जिल्हा परिषदेचे सीईओ कुंभार यांची नुकतीच मुंबई महानगर पालिकेच्या सहआयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी पुणे येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता अजित पवार हे बीडचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. राज्य सरकारने आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी दि.20 ऑगस्ट रोजी बदल्या केल्या असून यामध्ये अजित कुंभार यांचा समावेश आहे. बीड येथे येणारे अजित पवार हे पुणे येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी (जात पडताळणी) हे म्हणून कार्यरत होते. त्यांची बदली आता बीडच्या सीईओ पदी करण्यात आली आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा