कोरोनामुळे छोट्या व्यावसायिकांना शासनाने विनाअट दहा हजारांची मदत द्यावी- गालफाडे




केज । मागील दोनवर्षांपासून कोरोनामुळे व्यवसाय बंद स्थितीत असल्याकारणाने छोट्या व्यावसायिकांच्या समोर आपला व्यवसाय नव्याने उभारण्याचे मोठे संकट उभा राहिले आहे अशा बिकट परिस्थितीत सरकारने त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असून त्यासाठी कोणतीही अट न ठेवता सरसकट प्रत्येकी दहा हजाराची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी बहुजन रयत परिषदेचे प्रदेश अध्यक्ष रमेश गालफाडे यांनी केज येथील पत्रकार परिषदेत केली तसेच महिला सबलीकरणावर शासनाने भरधावा, तर साखर संघाला शिंक आली तरी तत्परता दाखवणाऱ्या सरकारने दीनदुबळ्यांच्या महामंडळाबाबतीत भेदभाव करणे योग्य नसल्याची टीका माजीमंत्री तथा प्रा लक्ष्मण ढोबळे यांनी केली.
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बहुजन रयत परिषदेच्या वतीने 18 जुलै ते 5 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रभर नवनिर्धार संवाद अभियान राबवण्यात येत असून नाशिक विभागात सुरु झालेले हे अभियान पुणे , नागपूर , अमरावती , विभाग करत मराठवाड्यात दाखल झाली त्याअनुषंगाने या अभियानाविषयी माहिती देण्यासाठी त्यांनी केज येथे पत्रकार परिषद घेत आपली मते व अभियानाच्या उद्देशाविषयी माहिती दिली

यावेळी पत्रकार परिषदेत पुढे बोलताना रमेश गालफाडे म्हणाले कि ; आठ हजार किमीचा प्रवास करत हे अभियान आज बीड जिल्ह्यात पोहोचले आहे यादरम्यान बहुजनांशी आम्ही चर्चा व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या स्थानिक अधिकारी वर्गाशी समन्वय साधत निकाली काढण्याचा प्रयत्न करत आहोत यात लोक शिक्षण व महिलांच्या वेगवेगळ्या समस्यांविषयी भरभरून बोलत आहेत त्यामुळे हे अभियान आपल्या उद्देशासह मार्गक्रमण करत असल्याचा आनंद आपल्याला होत आहे दरम्यान या अभियानात आणखीन एक बाब प्रकर्षाने समोर दिसून आली ती म्हणजे मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे बहुजन समाजाच्या छोट्या व्यवसायिकांचे व्यवसाय कोलमडून पडले आहेत त्यामुळे त्यांना अर्थातच त्यांच्या व्यवसायांना नव्याने उभारी देण्यासाठी कोणतीही अट न ठेवता शासनाने प्रत्येकी दहा हजाराची मदत करावी अशी आमच्या संघटनेची शासनाला मागणी असून याचा गांभीर्याने विचार न झाल्यास संघटना आंदोलन करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला
यावेळी बोलताना परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा लक्ष्मण ढोबळे यांनी माविआ च्या एकूणच धोरणावर टीका करत साखर संघाला शिंक आली तरी तत्परता दाखवणाऱ्या या सरकारची तत्परता दीनदुबळ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन झालेल्या विविध विकास महामंडळांना निधी उपलब्ध करताना कुठे जाते हे मोठ कोडेच आहे असे सांगत शिखर बँक तर फक्त परिवारासाठीच आहे कि काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही असे म्हणत महामंडळे फक्त पदापुरतीच आहेत का ? याचे उत्तर सरकारने देणे गरजेचे आहे एकूणच या अभियानाच्या समाप्तीनंतर परिषदेचे शिष्टमंडळ समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी प्रदेश अध्यक्ष रमेश गालफाडेनच्या नेत्रत्वाखाली राज्यपाल महोदयांची भेट घेणार असल्याचे सांगत बहुजन रयत परिषद भविष्यात आक्रमक होत सरकारची कोंडी करणाऱ्या मार्गावर चालणार असल्याचे सूतोवाच या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले महिलांच्या न्यायहक्कांसाठी परिषद भविष्यात मार्गदर्शन अर्थातच मदत कार्यालय सुरु करण्याचा विचार करत असल्याचे यावेळी परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा कोमल साळुंखे यांनी यावेळी सांगत महिलांसाठी देखील भरीव कार्य करण्यासाठी परिषद प्रतिबद्ध असल्याचे सूचित केले

यावेळी परिषदेचे ईश्वर क्षीरसागर , प्रा बबन गायकवाड , दिलीप तेलंग , बबन नेटके , प्रा रमेश पाटोळे , गणेश कांबळे , संदीप लोखंडे , बबन कांबळे यांची मुख्य उपस्थिती होती.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा