बीड जिल्ह्य़ातील आरोग्य विभागातील गैरव्यवहार प्रकरणात सीबीआई, लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीसाठी धरणे आंदोलन -डाॅ. ढवळे 




बीड l जिल्ह्य़ातील कोरोना कालावधीत आरोग्य विभागातील रेमडीसिवीर इंजेक्शन गैरव्यवहार तसेच सीसीटीव्ही खरेदीत, जम्बो ऑक्सिजन सिलेंडर ,तसेच प्रेरणा प्रकल्प अंतर्गत तसेच जिल्हा हिवताप कार्यालयातुन बोगस प्रमाणपत्र वितरीत प्रकरणात उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडल लातूर डाॅ.एकनाथ माले यांचा भ्रष्ट आधिका-यांची पाठराखण पाहता ठोस कारवाई न केल्याबद्दल त्यांची उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी आणि आरोग्य विभागातील गैरव्यवहार प्रकरणात सीबीआई तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी तसेच कोरोना कालावधीत खर्चाचे ऑडीट करण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व शेख युनुस च-हाटकर भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू केले आहे.

बीड जिल्ह्य़ात कोरोना कालावधीत आरोग्य विभागातील नियमांना डावलुन मंजुरी तसेच अवाजावी खर्च कागदोपत्रीच कामे दाखवुन गैरव्यवहार केल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांनी पुराव्यासह केल्या असून तक्रारीची शहानिशा करण्याकरीता बीड जिल्ह्य़ातील कोरोना कालावधीत संपुर्ण खर्चाचे ऑडीट करण्यात यावे.

बीड l  जिल्ह्य़ातील रेमडीसिवीर इंजेक्शन गैरव्यवहार प्रकरणात तसेच प्रेरणा प्रकल्पात अंतर्गत 12 लाख 63 हजार रूपये कंत्राटी मानसोपचारतज्ञ डाॅ.सुदाम मोगले यांनी आत्महत्याग्रस्त शेतक-यांना औषधोपचार, समुपदेशन आदि कामांसाठी कागदोपत्रीच दाखवून हडपले असून संबधित प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात यावेत. बीड जिल्हा हिवताप कार्यालयातुन बोगस प्रमाणपत्र वितरीत करण्यात येऊन शासकीय नियमांचे उल्लंघन करून कोट्यावधी रूपयांचा अपहार केला असून संबधित प्रकरणात उपसंचालक डाॅ.एकनाथ माले केवळ नोटीस तसेच अहवाल आदि तांत्रिक बाबी दाखवुन कारवाई करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ केल्याबद्दल त्यांची स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, आणि बीड जिल्ह्य़ातील आरोग्य विभागातील गैरव्यवहार प्रकरणात सीबीआई तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत कारवाई करण्यात यावी यासाठी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य मंत्रालय, आयुक्त आरोग्य संचनालय मुंबई, तसेच विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांना निवेदन दिले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा