वर्दीतली लेडी सिंघम! ४ महिन्यात ४०० कारवाया, मोक्षदा पाटील यांच्या मूळे वाशीम मध्ये गुन्हेगारील आळा




वर्दीतली लेडी सिंघम! ४ महिन्यात ४०० कारवाया, मोक्षदा पाटील यांच्या नावाने वाशीम मध्ये होते गुंडाची पळापळ

मराठवाडा पत्र टीम


खूप वेळ झाला तरी या कोरोनाने आपल्या देशाला जकडून ठेवले आहे, पण आता कोरोना कमी होताना दिसत आहे पण जेव्हा कोरोनाचे बिकट संकट होते तेव्हा मात्र आपल्या पोलीस बांधवांनी आपल्यासाठी अहोरात्र जागरण केली, कोंन्ही विनापरवाना बाहेर जातंय का ? तोंडावर कोण्ही मास्क लावत नाही याची विचारपूस केली या सर्व गोष्टी जनतेसाठीच होत्या. तर आज आम्ही अश्याच एका आज लेडी ऑफिसर बद्दल बोलणार आहोत.
ज्यांच्या नावाने गुंड असो किंवा चोर घाबरून पळून जातात त्या ज्या ठिकाणी येतात तिथे त्यांना सलाम ठोकले जातात, कोरोना काळात तिने जनतेसाठी खूप मदत केली आहे मित्रांनो आताची जनरेशन बदलली जरी असली तरी भारतातील रूढी परंपरेनुसार काही मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अश्या दृष्टीकोनातून चालत असलेले काही कुटूंब याला मोक्षदा पाटील नक्कीच एक आदर्श आहेत.
मित्रांनो मोक्षदा अनिल पाटील या मूळच्या कावपिंपरी ता. अमळनेर जिल्हा. जळगाव येथील आहेत मोक्षदा यांची आपल्या महाराष्ट्रात खूप चर्चा चालु आहे, वाशीम जिल्ह्यात गुंडांच्या मुसक्या अवळण्यात त्या खूपच अव्वल आहे. त्यांनी वाशीम मध्ये आपल्या नावाचा धाक निर्माण केला आहे. मोक्षदा यांचे वडील अनिल ओंकार पाटील ठाणे महानगर पालिकेत अभियंता होते त्यांच्या या दोन्ही मुलींनी आपले मार्ग वेगवेगळे निवडले.

त्या त्यांच्या या मार्गात यशस्वी देखील झाल्या आणि त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचा दबाव टाकला नाही, मुंबई मध्ये झेविअर्स महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झाल्या नंतर त्या पुकार या सामाजिक संस्थेत काम करू लागल्या. २०११ साली त्या IPS अधिकारी झाल्या मोक्षदा या नाशिक आणि नागपूर येथील परीवेक्षाधीन पोलीस अधिकारी होत्या. जळगाव येथे त्या अप्पर पोलीस अधीक्षक असताना त्यांनी हिंदू मुस्लिम एक्या साठी भरीव कामगिरी केली आहे.
सध्या मोक्षदा या औरंगाबाद येथे पोलीस अधीक्षक या पदावर आहेत, वाशीम येथे रोडरोमीओंना चांगलाच धडा शिकवला त्याचबरोबर निर्भया पथकाद्वारे जरब बसवली. वाशीम जिल्ह्यात ४ महिन्यात ४०० कारवाही करणाऱ्या वाशीम मधील त्या पाहिल्याच महिला पोलीस आहेत. “गुटखा,दारू,सट्टेबाजी ” याला त्यांनी कायमचा रोख लावला आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा