ना.संजयजी बनसोडे व सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत सिरसाळा अर्बन निधी लि.चा अंबाजोगाई मध्ये शुभारंभ 




 

 

अंबाजोगाई ।
अंबाजोगाई शहरात आर्थिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करण्यासाठी सुरू होत असलेल्या
सिरसाळा अर्बन निधी लि अंबाजोगाईचा शुभारंभ 29 ऑगस्ट रोजी स्वच्छता व पाणी पुरवठा, संसदीय कार्य, बांधकाम राज्यमंत्री  मा.ना. संजयजी बनसोडे साहेब व सुप्रसिध्द सिनेअभिनेत्री मा. दिपालीताई सय्यद भोसले यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होत असल्याची माहिती सिरसाळा अर्बन निधी लि चे संस्थापक अध्यक्षजनक साहेबराव उबाळे यांनी दिली आहे.
अंबाजोगाई व पंचक्रोशी मधील
गरजवंत, व्यावसायिक, शैक्षणिक, वैयक्तिक, औद्यागिक विकासासाठी आर्थिक आधार देण्याच्या संकल्पनेतून बँकीग क्षेत्रात पदार्पण करत असलेल्या सिरसाळा अर्बन निधी लि अंबाजोगाई चा शुभारंभ रविवार दि. २९ ऑगस्ट २०२१ वेळ : दु. २.०० वाजता संपन्न होत असुन या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वच्छता व पाणी पुरवठा, संसदीय कार्य, बांधकाम राज्यमंत्री मा.ना. संजयजी बनसोडे साहेब यांच्या हस्ते संपन्न होत असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. आ. संजय भाऊ दौंड विधान परिषद सदस्य हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण
म्हणुन सुप्रसिध्द सिनेअभिनेत्री तथा
संस्थापक, दिपालीताई सय्यद भोसले चॅरीटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य
मा. दिपालीताई सय्यद भोसले या राहणार असुन प्रमुख अतिथी म्हणुन मा. आ. नमिताताई मुंदडा विधानसभा सदस्य, केज, मा. श्री. पृथ्वीराज साठे मा. आमदार, केज विधानसभा, मा. राजकिशोरजी मोदी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस बीड, मा कालिदासजी आपेट कार्याध्यक्ष शेतकरी संघटना, मा. विष्णुपंत सोळंके उपाध्यक्ष पणन महासंघ,
मा. अॅड. शरदअण्णा लोमटे अध्यक्ष, वकील संघ, अंबाजोगाई,
मा. रणजित चाचा लोमटे प्रदेश सरचिटणीस, रा.यु.कॉ., मा. प्राचार्य डॉ. कमलाकरजी कांबळे, मा. डॉ. राजेश इंगोले मानसोपचार तज्ञ,
मा. श्री. दत्तात्रय आंबेकर पत्रकार, दै. झुंजार नेता तथा बीड जिल्हा कार्याध्यक्ष मराठी पत्रकार परिषद, मुबंई, मा. श्री. ज्ञानेश्वर रोडगे शिक्षण विभाग, औरंगाबाद, मा धनाजी फड सर निवेदक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिवचंद्र कॉम्प्लेक्स, डीसीसी बँके समोर, मिनाताई ठाकरे चौक, अंबाजोगाई या ठिकाणी संपन्न होत असलेल्या या सोहळ्यास शुभचिंतकानी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जनक साहेबराव उबाळे संस्थापक अध्यक्ष, सिरसाळा अर्बन निधी लि. अंबाजोगाई, व्हा चेअरमन श्री. अशोक साहेबराव उबाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.नंदा रामभाऊ आसबे, यांच्या सह संचालक सर्वश्री सौ. वनमाला बाजीराव आगलावे, श्री. बाजीराव धोंडीबा आगलावे, सौ. शिल्पा रामभाऊ असबे, श्री. चैतन्य अंगद पायघन, श्री मनजित मंचक भिसे, श्री.भागवत भाऊसाहेब इंगळे,  श्री. ओमकेश लक्ष्मण दहिफळे, कायदेशीर सल्लागार अॅड. व्ही.डी. शिंदे यांनी केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा