​​राज्य शासनाने ३९ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती आणि पदे अवनत करून नवीन नियुक्त्या दिल्या




​​

​​राज्य शासनाने ३९ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती आणि पदे अवनत करून नवीन नियुक्त्या दिल्या

 

दोन पदे अप्पर पोलीस महासंचालकांची वाढवली
औरंगाबाद पोलीस आयुक्त आता अपर पोलीस नाहासंचालक

नांदेड : महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ ३९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या केल्या आहेत. बदल्यांसाठी ३१ ऑगस्टची मुदत सरकारने निश्चित केली आहे. दोन अपर पोलीस महासंचालकाची पदे सरकाने वाढवली आहेत.त्यात एक औरंगाबाद पोलीस आयुक्त आणि सह आयुक्त गुन्हे शाखा मुंबई असे आहेत.

राज्याच्या गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने ३७ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या आणि पदोन्नत्या जाहीर करण्यात आल्या आहेत.काही अधिकाऱयांना पदोन्नती देतांना त्यांचे आताचे पदच वरिष्ठ श्रेणीत बदलले आहे.नवीन नियुक्ती दिली नाही.
बदल्या झालेले आणि पदोन्नती प्राप्त करणारे अधिकारी पुढील प्रमाणे आहेत.त्यांचे नवीन नियुक्ती ठिकाण कंसात लिहिले आहे. ए.एम.कुलकर्णी – अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग (अपर पोलिस महासंचालक सुधार सेवा पुणे),संजय के. वर्मा –  अपर पोलिस महासंचालक मुख्य दक्षता अधिकारी महाराष्ट्र गृह निर्माण मुंबई (अपर पोलिस महासंचालक नियोजन व समन्वय).
एस.जगन्नाथन – अपर पोलिस महासंचालक नियोजन व समन्वय (अपर पोलिस महासंचालक महाराष्ट्र विद्युत महामंडळ), रितेश कुमार – अपर पोलिस महासंचालक दळण वळण व परिवहन विभाग (अपर पोलिस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे), संजीव के.सिंघल – अपर पोलिस महासंचालक प्रशासन मुंबई (अपर पोलिस महासंचालक आस्थापना), अर्चना त्यागी – अपर पोलिस महासंचालक राज्य राखीव पोलीस बल मुंबई (अपर पोलिस महासंचालक पोलीस गृह निर्माण व कल्याण महामंडळ).
प्रशांत बुरडे – अपर पोलिस महासंचालक गृह रक्षक दल मुंबई (अपर पोलिस महासंचालक गृह निर्माण),अनुपकुमार बलबीरसिंह -अपर पोलिस महासंचालक एमएसईबी (अपर पोलिस महासंचालक प्रशासन मुंबई),सुनील रामानंद – अपर पोलिस महासंचालक एमएसईबी (अपर पोलिस महासंचालक दळण वळण),प्रवीण सयाजीराव साळुंके – विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे  (अपर पोलिस महासंचालक विशेष अभियान पदोन्नतीने),मधुकर पांडे – विशेष पोलीस महानिरीक्षक सागरी सुरक्षा (अपर पोलिस महासंचालक आर्थिक गुन्हे शाखा मुंबई  पदोन्नतीने),ब्रिजेशसिंह -विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशासन (अपर पोलिस महासंचालक व महा समादेशक गृह रक्षक दल मुंबई पदोन्नतीने).
चिरंजीवप्रसाद विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र (अपर पोलिस महासंचालक राखीव पोलीस बलपदोन्नतीने), डॉ.रविंद्रकुमार सिंगल – नियंत्रक वैधमापन शास्त्र मुंबई (अपर पोलिस महासंचालक हेच पद श्रेणी वाढवून) औरंगाबाद येथील आयजी पदाचे पोलीस आयुक्त हे पद श्रेणी वाढ करून ते पद अपर पोईस महासंचालक करण्यात आले आहे.तेथे डॉ.निखील जे.गुप्ता यांना नियुक्ती देण्यात आली आहे.तसेच आयजी चे पद मुंबई मधील गुन्हे शाळेचे श्रेणी वाढ करून तेथे अपर पोलीस महासंचालक पदाचे अधिकारी अशा आयुक्त गुन्हे शाखा मुंबई या पदावर निकेत कौशिक यांना नियुक्ती दिली आहे.
अश्वती दोरजे – संचालक महाराष्ट्र पोलीस अकादमी नासिक (सह पोलीस आयुक्त नागपूर शहर),राजेश प्रधान – विशेष पोलीस महानिरीक्षक आस्थापना मुंबई (विशेष पोलीस महानिरीक्षक सागरी सुरक्षा),छेरिंग दोरजे – विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा मुंबई (विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र), यशस्वी यादव – सह पोलीस आयुक्त मुंबई (आयजी सायबर मुंबई), राजवर्धन – विशेष पोलीस महानिरीक्षक महिला अत्याचार प्रतिबंध (सह पोलीस आयुक्त वाहतूक मुंबई) अंकुश आर.शिंदे – पोलीस आयुक्त नागपूर शहर (विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा मुंबई पदोन्नतीने), राजेशकुमार मोर – केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत आले (संचालक महाराष्ट्र पोलीस अकादमी नासिक).
प्रवीणकुमार पडवळ – अपर पोलिस आयुक्त वाहतूक मुंबई (अपर पोलीस आयुक्त उत्तर विभाग मुंबई), एस.व्ही. कोल्हे – अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा मुंबई (जायगुप्त वार्ता विभाग पद अवनत करून),डी.आर. कराळे – अपर आयुक्त मुंबई पूर्व विभाग (पोलीस आयुक्त सोलापूर शहर) एम.आर. धुर्ये – पोलीस उप महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल नागपूर (अपर आयुक्त गुन्हे नवी मुंबई),आर.बी.डहाळे – पोलीस उप महानिरीक्षक बिनतारी संदेश पुणे (अपर आयुक्त दक्षिण विभाग पुणे शहर),अशोक आर.मोराळे – अपर पोलीस आयुक्त पुणे (ठाणे शहर अपर आयुक्त),ए.डी.कुंभारे – अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग ठाणे (पोलीस उप महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल नागपूर).
डी.आर.सावंत – अपर पोलीस आयुक्त उत्तर विभाग ठाणे (अपर पोलीस आयुक्त दक्षिण विभाग मुंबई शहर),आर.एल.पोकळे – अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड (अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग ठाणे शहर),संजय शिंदे – अपर पोलीस आयुक्त दक्षिण विभाग पुणे शहर (अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड),संजय येनपुरे – अपर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर (बिनतारी संदेश विभाग पुणे),बी,जी, शेखर – अपर पोलीस आयुक्त गुन्हे नवी मुंबई (पोलीस उप महानिरीक्षक नासिक परिक्षेत्र पद अवनत करून),सत्यनारायण – अपर आयुक्त दक्षिण विभाग मुंबई शहर (अपर पोलीस आयुक्त वाहतूक मुंबई शहर).
राजीव जैन – पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मुंबई शहर (अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा मुंबई शहर पदोन्नतीने),अभिषेक भगवान त्रिमुखे – पोलीस उप आयुक्त परिमंडळ ९ मुंबई शहर (पोलीस उप महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल मुंबई पदोन्नतीने),सुधीर कल्लय्या हिरेमठ – पोलीस उप आयुक्त मुख्यालय पिंपरी चिंचवड (पोलीस उप महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे पदोन्नतीने).
या ३९ आयपीएस बदल्यानंतर अद्याप पोलीस  अधीक्षक आयपीएस आणि राज्यसेवेतील अधिकारी आणि अपर पोलीस अधीक्षक पदाचे अधिकारी यांच्या बदल्या होणे शिल्लक आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा