आमदार संदीप क्षीरसागर व बाळासाहेब अजबे यांच्या वाढदिवसानिमित्त कमलताई निंबाळकर यांचा सामाजिक उपक्रम




धान्यवाटप, वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला वाढदिवस। 


बीड: आमदार संदीप क्षीरसागर व आमदार बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्षा कमल निंबाळकर यांच्या पुढाकारातून भरगच्च सामाजिक उपक्रम घेण्यात आले. गरजूंना धान्य तसेच वृक्षारोपण करुन दोघांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

आमदार संदीप क्षीरसागर व बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम घेण्याचा निर्णय प्रदेश उपध्यक्षा कमलताई निंबाळकर यांनी घेतला होता. प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कमलताई निंबाळकर यांनी शुक्रवारी (दि.२७) वृक्षारोपण आणि धान्यवाटप कार्यक्रम घेतला. नाळवंडी परिसरात पालावर राहणाऱ्या गरजू कुटुंबांना धान्य वाटप केले. त्यामुळे या लोकांना दिलासा मिळाला. त्यानंतर चऱ्हाटा रोडवर वृक्षारोपण करण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर व बाळासाहेब आजबे यांच्या हातून अधिकाधिक सामाजिक कार्य घडत राहो व त्यांना उत्तम आरोग्य लाभो, असे साकडे कमलताई निंबाळकर यांनी घातले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा