कोरोनाचे विषाणु ज्याप्रकारे दिसत नाही, त्याप्रमाणेच न दिसणारा परमेश्वर आम्हाला तारणार नाही का? ह.भ.प.आरतीताई शिंदे




 

ढोरगावचे मा.सरपंच ज्ञानेश्वर सरवदे यांच्या वतिने भाविक भक्तासाठी महाप्रसादाचे आयोजन

माजलगाव l ( प्रतिनिधी ) तालुक्यातील खरात आडगाव येथे पवित्र आशा श्रावण महिन्यातील तिसरा शनिवार रोजी शनी महाराजांची पुर्नर प्रतिस्थापना सिहांसनावर अरुढ झालेली प्रतिस्धापना केलेल्या मुर्तीमध्ये प्राण निर्माण होतो,तसेच ज्याप्रमाणे कोरोनाचा विषाणू ज्याप्रकारे दिसु शकत नाही, त्याप्रमाणेच आम्हाला न दिसणारा परमेश्वर अम्हाला तारणार नाही का? असे प्रतिपादन ह.भ.प.आरतीताई शिंदे यांनी खरात आडगाव येथील शनी महाराजाच्या पुर्नर प्रतिस्थापने प्रंसगी दि २८ आँगस्ट शनिवार रोजी किर्तनाद्वारे व्यक्त केले.याप्रसंगी या कार्यक्रमाचे ढोरगावचे मा.सरंपच तथा भाजपा तालुका उपध्याक्ष ज्ञानेश्वर सरवदे यांनी भाविकासांठी किर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले.

माजलगाव तालुक्यातील खरात आडगाव येथे शनि महाराजांच्या पुर्नर प्रतिस्थापना पवित्र अशा श्रावण महिन्यातील तिसऱ्या शनिवारी करण्यात आली,त्यानिमित्ताने ढोरगावचे मा.सरपंच तथा भाजपाचे तालुका उपध्याक्ष ज्ञानेश्वर सरवदे यांनी श्रीरामपूर येथील ह.भ.प.आरतीताई शिंदे यांचे सकाळी ११:०० ते ०१:०० या वेळेत किर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले होते,त्याप्रसंगी ह.भ.प.आरतीताई शिंदे यांनी किर्तनासाठी संत श्री एकनाथ महाराजांचा आंभग किर्तन सेवेसाठी निवडला
आवडी देवाशी तो ऐसा प्रकार!
नामाचा उच्चार रात्रंदिवस!
तुळसी माळ गळा,गोपीचंद टिळा!
हदय कनवळा वैप्णंवाचा!!
या आभागावर किर्तन करत खरात आडगाव येथे श्रावन महिन्यात शनी महाराजांची पुर्नर प्रतिष्ठा सिंहासनावर आरुढ होऊन प्रतिस्थापना केलेल्या मुर्ती मध्ये खऱ्या आर्थाने प्राण निर्माण होतो, ज्याप्रमाणे कोरोनाचा विषाणू आम्हाला दिसु शकत नाही त्याप्रमाणे आम्हाला न दिसणारा परमेश्वर तारु शकणार नाही का? यासह वेगवेगळ्या सिध्दांताद्वारे संत एकनाथ महाराजांच्या आभंगाचे विमोचन करुन ह.भ.प.आरतीताई शिंदे भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले.या किर्तनासाठी छोटेवाडी,रामनगर,कल्याण नगर,शिंपेटाकळी,सिध्देश्वर नगर,आनंदगाव, नि.टाकळीसह पंचक्रोशीतील भाविक भक्तांची उपस्थिती होती.यावेळी ह.भ.प.नारायण महाराज यमगर,ह.भ.प.तुकाराम महाराज घाडगे,मुंदगाचार्य हं.भ.प.दैलत महराज वगरे,टाळकरी व विणेकरी यांची उपस्थिती होती, किर्तना नंतर या कार्यकामाचे संयोजक ढोरगावचे मा.सरपंच तया भाजपाचे तालुका उपध्याक्ष ज्ञानेश्वर सरवदे यांच्या वतिने तिन हाजार भाविक भक्तांसांठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा