मनसे दहीहंडी साजरी करणारच; अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात




 

ठाणे : दहीहंडी जल्लोषात साजरी करावी, अशी अट राज ठाकरे यांच्या मनसेची आहे. माञ, ठाकरे सरकारने दहीहंडीवर बंदी घातली आहे. त्यामुळे, मनसे अन् शिवसेनेचा वाद पेटण्याची शक्यता आहे. दहीहंडी साजरी करता यावी म्हणून मनसेचे ठाणे-पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज आमरण उपोषण सुरू केले. मात्र, पोलिसांनी जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आलेले आहे.
मनसेने दहीहंडी साजरी करता यावी म्हणून नौपाडा येथील भगवती मैदानात स्टेज बांधलेला होता. या ठिकाणी मनसेचे नेते अविशान जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी आमरण उपोषण सुरू केले होते. तसेच ठिय्या आंदोलनही सुरू करण्यात आले होते. मात्र, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी जाधव यांनी घटनास्थळी जावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मनसे सैनिकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी आली होती. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला.

 

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा