मंदिर बंद का ?अण्णांचा ठाकरे सरकारला सवाल




 

मुंबई : कोरोनाची तीसरी लाट देशाच्या वेशीवर ठाण मांडून बसल्याचे तज्ज्ञ सांगत आहे. अशी परिस्थिती असताना आता महाराष्ट्रात मंदिरे उघडण्यासाठी ठाकरे सरकारवर दबाव वाढवला जात आहे. मंदिरे उघडण्याबाबत अण्णा हजारे यांनी आक्रमक अक्रमक भूमिका घेतलेली आहे. मंदिरे न उघडल्यास आंदोलनाचा इशारा देखील अण्णांनी ठाकरे सरकारला दिलेला आहे. मंदिरे उघडण्यास सरकारला काय अडचण आहे? दारुची दुकाने, हॉटेल्स सर्व काही खुले केले. तिथल्या गर्दीतून कोरोना होत नाही का? असा रोखठोक सवाल अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे.
अण्णा हजारे म्हणाले, मंदिरे उघडण्यासाठी रस्त्यावर उतरा. मोठे आंदोलन उभारा. मी स्वत: त्यात सहभागी होईन. 10 दिवसात जर मंदिरे उडण्याचा निर्णय सरकाने न घेतल्यास जेल भोरो आंदोलन करा मी तुमच्या बरोबर असेन, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
माझा विश्वास आहे की भरकटत चाललेल्या समाजाला फक्त मंदिरच तारु शकतात. त्यमुळे संतांचे विचार देणारी मंदिरं बंद का? संतांचे विचार सरकारला समजले नाहीत का?, असे म्हणत त्वरीत मंदिरं उघडण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
दरम्यान, शनिवारी अहमदनगरच्या मंदिर बचाव कृती समितीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली आणि राज्यातील बंद असलेली सर्व मंदिरे उघडण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती केली. या भेटीनंतर अण्णा हजारे यांनी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा