पोलीस अधिकाऱ्याला निरोप देताना गहिवरले नेक”नूर”




पोलीस अधिकाऱ्याला निरोप देताना गहिवरले नेक”नूर”

लक्ष्मण केंद्रे खाकीतला देव माणूस वृक्षलगवडीतून बालाघाटा चे नंदनवन केले – महंत लक्ष्मण महाराज मेंगडे

नागरिक भावुक.. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना दिला निरोप.

नेकनुर – दि ०३ सप्टेंबर (रामनाथ घोडके) :-नागरिकांच्या सुरक्षे सोबतच पर्यावरणाची रक्षा करणारे तसेच वृक्षरोपणाची चळवळ उभा करत नेकनूर हद्दीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स पो नी लक्ष्मण केंद्रे यांचा दि 03 गुरुवार रोजी बंकटस्वामी महाराजांच्या मठामध्ये ऱ्हदय सत्कार आयोजित करण्यात आला होता. लक्ष्मण केंद्रे खाकीतला देव माणूस आहेत त्यांनी वृक्षलगवडीतून बालाघाटा चे नंदनवन केले असे प्रतिपादन श्री ह भ प लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी केले. नेकनूर मध्ये आयोजित सत्कार सोहळयात ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती श्री ह भ प प्रा.नाना महाराज कदम,सुग्रीव रसाळ, नानासाहेब काकडे पाटील , डॉ गणेश ढवळे , रवींद्र काळे , नेकनूर येथील ग्रामपंचायत सदस्य ,पत्रकार अशोक शिंदे ,मनोज गव्हाणे , सुरेश रोकडे ,रामनाथ घोडके ,विकास नाईकवाडे ,उद्धव नाईकवाडे , पो ना अमोल नवले , सचिन डिडुळ यांच्या सह नेकनूर पंचक्रोशीतील अनेक गावचे सरपंच , शेकडो नागरिकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन बिजांकुर ग्रुप च्या वतीने करण्यात आले होते

नेकनूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांची बदली झाल्यानंतर बीजांकुर ग्रुप नेकनुर व पंचक्रोशीतील नागरिकांनी मिळून त्यांनी केलेल्या कामाबद्दल भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बंकटस्वामी मठात आयोजित या कार्यक्रमात बोलताना लक्ष्मण महाराज मेंगडे म्हणाले की खाकी वर्दीतील माणूस असून वृक्षसंवर्धनाचे प्रेम साहेबांनी जोपासले आहे त्याबरोबरच श्रीक्षेत्र बंकट स्वामी संस्थान श्री क्षेत्र चाकरवाडी श्री क्षेत्र कपिलधार या ठिकाणच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून नंदनवन केले आहे त्यांची ही चळवळ पुढे चालत राहावे लक्ष्‍मण केंद्रे यांचा आदर्श इतरही पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावा असे लक्ष्मण महाराज मेंगडे म्हणाले यावेळी बोलताना नाना महाराज कदम म्हणाले की पोलीस वर्दी मध्ये राहून माणूसकी जतन करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार आणि सलमान सोहळा होत असतो ते भाग्य लक्ष्मण केंद्र यांच्या वाट्याला आले नेकनूर परिसरातील लोकांना कायद्याच्या संरक्षणाबरोबरच वृक्षलागवड चळवळीचा बीजारोपण करण्याचा काम केल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या…

श्रीक्षेत्र बंकट स्वामी मठात आयोजित या कार्यक्रमास परिसरातील नव्वद गावातील सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक यांनी उपस्थिती लावली होती नेकनूर पोलीस स्टेशन च्या इतिहासात पहिल्यांदाच गावकऱ्यांनी मिळून पोलिस अधिकाऱ्याचा अशा पद्धतीने सत्कार केला यामुळे सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले कायद्याचे संरक्षण करताना गुन्हेगाराला सोडले नाही तसेच गोरगरिबांवर ती अन्याय होऊ दिला नाही म्हणून सर्व स्तरातील लोकांकडून लक्ष्‍मण केंद्रे यांचा सत्कार करण्यात आला.

एपीआय केंद्रे चे कार्य

पोलीस अधिकारी म्हटलं की सामान्य लोकांमध्ये कायद्याचा धाक असतो आणि हाच कायद्याचा धाक वापरून बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी वृक्षलागवड चळवळ कार्यान्वित केली आहे लॉक डाऊन मुळे लोक घरात होते गुन्हेगारीचे प्रमाण कमी झालं होतं यामुळे थोड्या प्रमाणात आम्हाला कामाचा ताण कमी झाला आणि त्याच मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील 90 गावात सरपंच पोलिस पाटील आणि पत्रकारांना एकत्रित करत अंकुर ग्रुप ची स्थापना केली आणि याच्या माध्यमातून तब्बल 75 हजार झाडांचे रोपण केले आहे असे केंद्रे यांनी सांगितले पोलीस अधिकारी असून पर्यावरणाच्या संदर्भात संवेदनशीलतेने केलेले काम याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, विशेष म्हणजे वृक्ष लागवडीसाठी देशी झाडांची निवड करत पिंपळ वड चिंच जांभूळ या झाडांचे लागवड केली आज नेकनूर च्या बाजार तळावर लागवड केलेल्या झाडामुळे हिरवळ पसरली आहे. तर बालाघाट डोंगर रांगेतील आध्यत्मिक केंद्र श्री क्षेत्र कपिलधार, श्री क्षेत्र चाकरवाडी या देवस्थानाच्या जागेत वृक्ष संवर्धनाची चळवळ सक्रिय झाली .

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा