आंधळं दळतंय आनं; कुत्रं पिठं खातंय ! -डॉ. ढवळे यांचे आंदोलन !




आंधळं दळतंय आनं कुत्रं पिठं खातंय, जिल्हाप्रशासनाच्या अनागोंदी कारभार निषेधार्थ आणि उपजिल्हाधिकारी भु-सुधार प्रकाश आघाव पाटील ,तहसिलदार राजाभाऊ जाधव यांच्यावर गुन्हेदाखलकरा:- डाॅ.गणेश ढवळे
बीड ।  जिल्हाधिकारी कार्यालयाचा अनागोंदी कारभार म्हणजे आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशा म्हणीप्रमाणे सर्वच विभागाचा कारभार दिसुन येतो, आष्टी तालुक्यातील रूई नालकोल शेख महंमद दर्गाह देवस्थान जमिन बनावट दस्तावेज तयार करून बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणात जमिनदारांवर गुन्हे दाखल झाले असून संबधित प्रकरणात जबाबदार उपजिल्हाधिकारी भु-सुधार प्रकाश आघाव पाटील व तहसिलदार राजाभाऊ कदम ,मंडळ आधिकारी, तलाठी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची व त्यांच्या नातेवाईकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली ,शेख युनुस च-हाटकर भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड, शेख अन्नेश, आसिफ शेख, सलिम शेख, फिरोज शेख, शाहपरी शेख, हवाबी शेख, अहमदाबी शेख, हिना शेख, सुहाना शेख आदिंनी जिल्हाधिकारी बीड कार्यालयासमोर “आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय “आंदोलन करण्यात आले.

मौजे रूईनालकोल ता.आष्टी.जि.बीड येथील शेख महंमद दर्गाह देवस्थान जमिन बनावट दस्तावेज तयार करून बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणात जमिन खरेदीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून उपजिल्हाधिकारी भु-सुधार प्रकाश आघाव पाटील व तहसिलदार आष्टी.जि.बीड राजाभाऊ कदम, मंडळ आधिकारी, तलाठी यांनी आर्थिक हितसंबंध जोपासत शासनाची दिशाभूल करून महसुल बुडवून फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच त्यांची व त्यांच्या नातेवाईकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, महसुल मंत्री, महसुल प्रधान सचिव, विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.

उपजिल्हाधिकारी भु-सुधार प्रकाश आघाव पाटील यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी आघावांकडेच

बीड जिल्ह्य़ातील धार्मिक स्थळांच्या ईनामी जमिन बोगस दस्तावेज तयार करून बेकायदेशीर खाजगी व्यक्तिच्या नावावर हस्तांतरण प्रकरणात विद्यमान उपजिल्हाधिकारी भु-सुधार कार्यालय बीड प्रकाश आघाव पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या दि.01/06/2021 आणि दि.07/06/2021 रोजीच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी बीड कार्यालयामार्फत चौकशीसाठी उपजिल्हाधिकारी भु-सुधार विभाग जि.का.बीड यांनाच चौकशीसाठी पत्रक देऊन नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी म्हटले आहे.

नामलगाव देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणात तहसिलदार शिरीष वमने यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार केल्यानंतर चौकशीसाठी शिरीष वमने यांनाच पत्रक
___
मौजे नामलगाव ता.जि.बीड येथील 26 एकर जमिन बनावट दस्तावेज तयार करून हस्तांतरण प्रकरणात उपजिल्हाधिकारी भु-सुधार प्रकाश आघाव पाटील व तहसिलदार शिरीष वमने यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या दि.23/06/2021 रोजीच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी उपविभागीय आधिकारी बीड यांना चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह परिपुष्ट अहवाल सादर करण्यात यावा असे आदेश काढल्यानंतर उपविभागीय आधिकारी बीड नामदेव टीळेकर यांनी ज्यांच्यावर आरोप आहे त्या शिरीष वमने तहसिलदार बीड यांनाच पत्रक काढुन चौकशी अहवाल सादर करावे म्हटले आहे.

ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप त्याचीच चौकशीसाठी पत्रक आणि निर्गमित शासकीय पत्रकावर नाव आणि पदनाम नाही, मुख्यमंत्री, प्रधान सचिव, विभागीय आयुक्तांना तक्रार
___
वरील प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयातील आधिकारी संगनमतानेच भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण करत कारवाई टाळण्याचा प्रयत्न करताना दिसतात, जाणीवपूर्वक ज्या आधिका-यांवर भ्रष्ट कारभाराचा आरोप आहे त्यांनाच चौकशी अहवाल सादर करा म्हणून आदेश काढायचे तसेच शासकीय परिपत्रकानुसार शासकीय निर्गमित कागदपत्रांवर नाव आणि पदनाम बंधनकारक असताना ते टाकायचे टाळायचे म्हणजेच भविष्यात सुनावणी झालीच तर माझी स्वाक्षरी नाहीच असा पवित्रा घ्यायचा संबधित प्रकरणात जिल्हाधिकारी जबाबदार असल्याने त्यांची तक्रार मुख्यमंत्री, प्रधान सचिव, विभागीय आयुक्तांना केलेली असून प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा