तलवाडा येथील म. ग्रा. बँकेच्या शाखाधिकारी यांची बदली करण्यासाठी पाच ग्रामपंचायतीचा ठराव




 

तलवाडा l गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरातील अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अडचणींना सामना करावा लागत आहे वरून पावसाने झोडपले खालून प्रशासनाने झोडपले अशी चित्र पाहावयास मिळत आहे प्रशासन शेतकऱ्यांसाठी योजना आहे मात्र खालील अधिकारी शेतकऱ्यांना मोजत नाही आज तलवाडा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तलवाडा सर्कल मधील पाच ग्रामपंचायती ठराव घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे ठरावचे निवेदन देण्यात आले तलवाडा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी कोणाला जुमानत नाही अशी अनेकांची ओरड व शेतकऱ्यांना तारखेवर तारखा सांगत आहे.यांच्या विरोधात निवेदनात लिहिलेले आहे की आज पीक कर्जासाठी गेले असताना काही जणांना वापस करण्यात येत आहे आमचा टार्गेट पूर्ण झाला आहे काही सुज्ञ नागरिकांनी लेखी मागितली तर त्यांना सुद्धा मिळत नाही आमचं संपलेला आहे आल्यानंतर तुम्हाला दिवस आज अतिदृष्टी पावसामुळे शेतकरी सर्वसामान्य नागरिक आज अडचणींचा सामना करत आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन तात्काळ पिक कर्जाचे राहिलेले शेतकऱ्यांना डिमांड हे लवकरात लवकर देण्यात यावे व शेतकर्‍यांची पिळवणूक थांबावी अशी मागणी तलवाडा ग्रामपंचायत , चव्हाणवाडी ग्रामपंचायत, अंतरवली बुद्रुक ग्रामपंचायत, राजापूर ग्रामपंचायत, मिरजगाव ग्रामपंचायत, ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन िवेदन जिल्हा अधिकारी कार्यालय येथे देण्यात आला आहे तात्काळ यांची बदली करा नसता सरसकट शेतकर्‍यांना पिक कर्ज देण्यात यावे अशी मागणी पाच ग्रामपंचायत ठराव देण्यात आले आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा