तर मी जबाबदार राहणार नाही





 

मुबंई : गेल्या काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारच्या भूमिकेवर हल्ला चढवला होता. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात पाठवलेले पत्र आपल्याला मान्य नसल्याचे संभाजीराजे म्हणाले होते.  आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे. राज्य सरकारने पाठवलेले पत्र अधिकाऱ्यांनी लिहून पाठवायला हवे आहे. फक्त पाठवायचे म्हणून हे लेखी उत्तर पाठवले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील याची पुरेशी दखल घेतलेली नाही, अशा शब्दांत संभाजी राजे यांनी आपला संताप व्यक्त केला.

संभाजीराजे म्हणाले, आमची परीक्षा घेऊ नका. सरकारने ठरवावे, तेव्हा बैठकीला बसायची आमची तयारी आहे. पण सरकारची तयारी नसेल, तर रायगडावर बसून आमची मूक आंदोलनाची तयारी आहे. मग नांदेडला जशी गर्दी जमली, तशी गर्दी जमली तर मी जबाबदार राहणार नाही. हे चालेल का सरकारला? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे. दरम्यान, यावेळी बोलताना संभाजीराजे भोसले यांनी आपण समाजाला वेठीला न धरता एकटे आंदोलन करू, ज्यामुळे कोरोनामध्ये होणारी गर्दी टाळता येईल, असे देखील संभाजीराजे यांनी नमूद केले आहे.

आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बाबतीत म्हटलेय की १८८५ कोटी रुपयांचा निधी वाटला. हे अधिकारी लोकं एवढे फसवतात. हे पैसे सरकारने दिलेले नसून बँकांनी दिलेले आहेत. हे मागच्या सरकारने केलेले आहे. तुम्ही किती दिले हे अधिकाऱ्यांनी सांगावे. आत्ता जाहीर केले साडेबारा कोटी रुपये. जे पूर्वीच्या सरकारने केलं, त्यापुढे आत्ताच्या सरकारने काहीही केलेले नाही, असे देखील संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा