करुणा शर्मा यांच्या कोठडीत वाढ




बीड : बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल सापडल्याप्रकरणी करुणा शर्मा यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे. १८ सप्टेंबरपर्यंत करुणा शर्मा यांना न्यायालयीत कोठडीत रहावे लागणार आहे. करूणा शर्मा परळीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने, एकच खळबळ माजली होती. त्यानंतर पोलिसांनी करूणा शर्मा यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱ्या करुणा शर्मा रविवारी परळीत दाखल झाल्या होत्या. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांच्या वाहनामध्ये पिस्तूल आढळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले होते. तर, समाज माध्यमातून धनंजय मुंडेंच्या विरोधातील सर्व पुरावे जाहीर करण्याचा इशारा करूणा शर्मा यांनी दिला होता.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा