आधुनिक भारत घडवण्यासाठी महापुरुषांची विचारधारा महत्वाची- बनसोडे पी.व्ही




 

बीड (प्रतिनिधी) परिवर्तनाचा लढा हा केव्हाही संपत नसतो तो संपणार ही नाही, लढा लढणारे लढवय्ये निर्माण व्हावे लागतात. हे सर्व दशा झालेल्या समाजाला दिशा देण्याचे कार्य करणारे म्हणून महत्त्वाचे ठरतात. हे सर्व महान कार्याचे प्रतीक आहे, असे महान कार्य करणारे महापुरुष निर्माण होतात. महापुरुष हा राष्ट्राचा निर्माता असतो तो कोण्या एका जातीचा किंवा धर्माचा असू शकत नाही. महापुरुषांना जात नसते, आधुनिक भारत घडवण्यासाठी महापुरुषांची विचारधारा महत्त्वाची आहे. असे मत निवृत्त अतिरिक्त (सीईओ) कार्यकारी अधिकारी बनसोडे पी. व्ही. यांनी आपले मत व्यक्त केले.
राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान, बीड च्या वतीने सम्यक संकल्प फेसबुक लाइव्ह प्रक्षेपित, राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2021 च्या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. इंजि. वसंत तरकसे, मा. कॅप्टन राजाभाऊ आठवले, मा. गुलाबराव भोले, मा. प्रा. राम गायकवाड तर प्रमुख उपस्थिती, प्राचार्य- उमा जगतकर, प्राचार्य – विद्या अवघडे, आदींसह उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त, राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान,बीड चे अध्यक्ष मा. प्रा. प्रदीप रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली. या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेकरिता एकूण 25000 रोख रक्कम व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते ही स्पर्धा मागील सहा वर्षापासून नियमित सुरू असून या वर्षी दुसऱ्यांदा ऑनलाइन पद्धतीने पार पडली. स्पर्धेत एकूण 15 उत्तेजनार्थ व प्रथम,द्वितीय,तृतीय असे एकूण 18 बक्षिसे देण्यात आली आहेत. प्रथम विजेता, नेहल योगेश जोशी- रेणाविकर विद्यालय, अहमदनगर (बक्षिस रक्कम 5000), द्वितीय- वैष्णव कैलास वाडेकर, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, हसनाबाद ( बक्षिस रक्कम 3000 ) तृतीय- समृद्धी संतोष वाघमारे, तुलसी इंग्लिश स्कूल, बीड (बक्षीस रक्कम 2000) व उत्तेजनार्थ – उद्धव हिलाल माळी, प्रफुल तोताराम माळी, हर्मिका बालाजी जगतकर, शारदा दीपक ससाने, दिव्या संदीप जोगदंड, सोनल मारुती धस, श्रेया मोतीराम कांबळे, अभिरामी रितेश देशमुख, यश दिनेश फुलवरे, कैवल्य सुनिल निसर्गन, ऋषिकेश त्र्यंबक कुडके, अंकिता काकासाहेब पोकळे, समर्थ मारुती धस, श्रेया बाळासाहेब पवार, हर्षदा हनुमंत चौधरी ( बक्षिस रक्कम प्रत्येकी 1000 ), सर्व स्पर्धकांना रोख रकमेसह प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राम गायकवाड यांनी केले, सूत्रसंचालन सिद्धार्थ सोनकांबळे यांनी तर आभार प्रा. अंकुश कोरडे यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम थेट सम्यक संकल्प फेसबुक लाइव्ह द्वारे प्रक्षेपित करण्यात आला, उपस्थित स्पर्धकांनी, पालकांनी, हितचिंतकांनी, चाहत्यांनी ऑनलाइन कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा