14 लाखांचा विदेशी दारुसाठा जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई





 

औरंगाबाद : केंद्रशासित प्रदेशात विक्रीस मुभा असलेल्या विदेशी दारुचा साठा राज्य उत्पादन शुक्ल विभागाने कारवाई करत जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कपिल दयासागर राठोड (रा. प्लॉट क्र. 31, राजनगर, शहानूरमिया दर्गा) आणि ऋषीकेश सोमनाथ धायडे (रा. प्लॉट क्र. 31, पृथ्वीनगर, सातारा परिसर) यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
विदेशी दारुची चोरटी वाहतूक केली जात असल्याच्या माहितीवरुन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सावंगी नाका येथे 15 सप्टेंबर रोजी सापळा रचत कारवाई केली होती. तपासणीत वाहनातून (एमएच-47-एडी-0738) विदेशी दारु तसेच विविध कंपनीच्या एकुण 432 बाटल्या आढळून आल्या. दादरा नगर हवेली व दिव दमन या ठिकाणी विक्रीला मुभा असलेल्या या दारुची चोरटी वाहतूक केल्याचे त्यावरुन समोर आले. त्यावरुन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कपिल राठोड याला अटक केली. त्याच्याकडून 11 लाख 79 हजार रुपयांचा साठा जप्त केला. तसेच चौकशीत मित्र ऋषीकेश धायडे याचे नाव समोर आल्यामुळे त्याच्या घरावर छापा मारुन दोन लाख 77 हजार 980 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सोबत चारचाकी गाडी स कुणी 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक विजय रोकडे करत आहे.

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा