लघुप्रकल्प, पाझर तलावांचे ऑडीट करा ! गेवराई तालुक्यातील निष्क्रीय प्रशासन व लोकप्रतिनिधींना भावपूर्ण श्रद्धांजली :-डाॅ.गणेश ढवळे 




___
गेवराई  l तालुक्यातील भोजगाव येथील रस्ता नसल्यामुळेच मृतदेहाची अवहेलना तसेच लघुप्रकल्प, पाझर तलावांचे ऑडीट करणे, धोकादायक साठवण तलावांची दुरूस्ती करून शासकीय हलगर्जीपणामुळू तलाव फुटुन नुकसान झालेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि दोन वर्षापासून रखडलेल्या पुलासाठी जबाबदार आधिका-यांवर कारवाई करण्यात यावी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी मयत निकीता संत, सुदर्शन संत यांच्यासह मृतप्राय प्रशासन व तथाकथित कार्यसम्राट लोकप्रतिनिधी यांना प्रतिनिधिक स्वरूपात भावपूर्ण श्रद्धांजली व शोकसभेचे आयोजन कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर , सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे,पांडुरंग आंधळे, शिवदास तांदळे, सुभाष तांदळे, आश्रुबा तांदळे, सुदाम कोळेकर, दिनानाथ शेवलीकर, भाऊसाहेब फुंदे आदि सहभागी आहेत.

__
गेवराई तालुक्यातील अमृता नदीवरील 2008 साली बांधलेला रस्ता व पुल 2019 मध्ये पुरात वाहुन गेला ,2020 मध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने महादेव संत या ऊसतोड मजुराचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला, त्यांचा मृतदेह नदीपात्रात ठेऊन भोजगाव येथील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर तहसिलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग आधिकारी, आ.लक्ष्मण पवार यांनी ग्रामस्थांची समजुत काढत पुल बांधण्याचे आश्वासन दिले. मात्र पुल बांधलाच नाही,त्यानंतर दि.24 सप्टेंबर रोजी भोजगाव येथील आत्महत्याग्रस्त निकिता दिनकर संत यांचा मृतदेह रस्ता नसल्यामुळेच खांद्यावर न्यावा लागला, त्यानंतर दि.26 सप्टेंबर रोजी अंत्यविधी सावडण्यासाठी आलेल्या सुदर्शन संत यांचा पाय घसरून तोल जाऊन नदीपात्रात बुडुन मृत्यु झाला. त्यामुळेच निष्क्रीय प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या निषेधार्थ मयत निकिता दिनकर संत व सुदर्शन संत यांच्यासह मृतप्राय प्रशासन व तथाकथित लोकप्रतिनिधी, कार्यसम्राट नेत्यांना प्रातिनिधिक स्वरूपात भावपूर्ण श्रद्धाजली वाहण्यात आली.

लघुप्रकल्प, पाझर तलावांचे ऑडीट करून शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात यावी:-डाॅ.गणेश ढवळे
___
बीड जिल्ह्य़ातील संपुर्ण लघुप्रकल्प तसेच पाझर तलावांचे ऑडीट करण्यात यावे, गेवराई तालुक्यातील 7 फुटलेले पाझर तलाव हे ग्रामस्थांनी शासनाच्या निदर्शनास आणुन सुद्धा संबधित विभागाच्या आधिका-यांनी कर्तव्यात कसूर करत अक्षय दुर्लक्ष केल्यामुळेच तलाव फुटुन शेतक-यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून चौकशी करण्यात येऊन संबधित दोषींवर कारवाई करण्यात येऊन स्थळपंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना केली आहे.

मो

संपादक

संपादक- दत्तात्रेय नरनाळे | मो.नं : 9822152955 datta.narnale@gmail.com/dailymarathwadapatra2021@gmai.com

शेअर करा